सांगोल्यात चक्क निम्या किंमतीत मिळणार महालक्ष्मी आटा चक्की, आ.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम

सांगोल्यात चक्क निम्या किंमतीत मिळणार महालक्ष्मी आटा चक्की, आ.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम

सांगोला,टीम-----


      सांगोला विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आ.शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबविले गेले. या मध्ये आरोग्य व रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, वृक्षरोपण, शालेय साहित्य,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच सांगोला येथे महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर आदी विविध  कार्यक्रम संपन्न असून सामाजिक बांधिलकी जपत आता आ. शहाजीबापू पाटील फाउंडेशन च्या वतीने कुटुंबासाठी उपयुक्त असणारी व सहज वापरता येणारी आटाचक्की केवळ फक्त 50 % सवलतीच्या दरात (निम्या किंमतीत) तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नंबर एक चा ब्रँड असणारी महालक्ष्मी आटा चक्की दोन मॉडेलमध्ये उपलब्ध असून रेग्युलर मॉडेल"14990" ऐवजी "6990" मध्ये व ऑल इन वन मॉडेल "21990" ऐवजी "9990" मध्ये उपलब्ध असून दि. 24 ऑक्टोंबर पासून आटाचक्की वाटप चालू झाले असून दिनांक 2 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10  ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आ.शहाजीबापू पाटील जनसंपर्क कार्यालय मिरज रोड सांगोला येथे वाटप चालू असणार आहे.

लाभार्थ्यांनी आटाचक्की घेण्यासाठी येत असताना सोबत आधार कार्ड लाभार्थी फोटो आणावा असे आवाहन आ. शहाजीबापू पाटील फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहीतीसाठी

02187-222999,9890901311,8805445654,

9970903399 या नंबर वरती संपर्क करण्यात यावा.एका कुुुटुंबास एकच चक्की मिळणार असून उत्पादक ते थेट ग्राहक यामुळे जोडले जाणार असल्याचे या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमात पहावयास मिळणार आहे.