4 हजार 15 दिवसांनंतर वाजला भोंगा,4 तालुक्यातील ऊस उत्पादकांचे उजळणार भाग्य,ऑक्सिजन मॅन अभिजीत पाटील यांनी साधली अवघ्या एक महिन्यात किमया

4 हजार 15 दिवसांनंतर वाजला भोंगा,4 तालुक्यातील ऊस उत्पादकांचे उजळणार भाग्य,ऑक्सिजन मॅन अभिजीत पाटील यांनी साधली अवघ्या एक महिन्यात किमया

अभिजीत पाटलांनी केवळ एक महिन्यात बंद अवस्थेत असलेला कारखाना केला सुरू:-सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट 4 च्या सांगोला गळीत हंगामाचा शुभारंभ

सांगोला,टीम------

बंद असलेला हा कारखाना कुणीही चालवायला घेत नव्हते परंतु अभिजित पाटील यांनी 3 कारखाने यशस्वीपणे चालवल्याचा अनूभव सोबत घेऊन सांगोला कारखाना चालविण्यासाठी घेण्याचे धाडस दाखवले आहे. त्याची धडाडी आणि सहकार क्षेत्रातील असलेला दांडगा अनुभव असल्याने यशस्वी चालू केला. अभिजित पाटलांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसांत आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर सुरू केला. सांगोला,माळशिरस,पंढरपूर,मंगळवेढा भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. त्यांनी त्यांचे इतर 3 कारखाने ज्या चांगल्या पद्धतीने चालवले तसेच हा कारखाना चालवतील व शेतकऱ्यांना योग्य मोबदला देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप झाले पाहिजे त्या दृष्टीने कारखान्याने नियोजन करावे.यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून, शेतीला पाणी कमी पडणार नाही, तरीही शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, हा कारखाना चालू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,आ. शहाजीबापू पाटील,प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून कारखाण्यास सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे.

धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.4 (सांगोला सह.साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर,उस्मानाबादचेआ.कैलासदादापाटील,सांगोल्याचेआ.शहाजीबापूपाटील,सांगोल्याचे मा.आ. दीपकआबा साळुंखे पाटील,शेकाप नेते चंद्रकांत देशमुख, मनसे नेते दिलीप धोत्रे, अविनाश महागावकर,डॉ.अनिकेत देशमुख,आदी उपस्थित होते. 

कुठेही वजन करून ऊस आणा----

यावेळी बोलतांना  चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले की,या कारखान्यासाठी ऊस देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना योग्य FRP प्रमाणे दर दिला जाईल.दर 15 दिवसाला शेतकऱ्यांना बिल दिले जाणार असून सभासदांच्या व कामगारांच्या हितासाठी भविष्यात कोजन डिसलेरी भविष्यात उभारली जाईल.कारखान्याचे यंदाच्या वर्षी 5 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट असून उत्पादीत होणारी साखर परदेशात पाठवली जाईल.शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याला ऊस आणतांना कुठेही वजन करून आणावे असे जाहीर आव्हान याप्रसंगी चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा,माळशिरस,सांगोला या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात उंचावल्या आहेत. विशेषता भाळवणी गटासह  विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक सभासदांच्या ऊस गाळपाची चिंता आता बऱ्यापैकी मिटली असल्याचे पहावयास मिळत आहे,कारण कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमाला या गटासह परिवारातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

गेल्या 11 वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी कारखान्याचे धुराडे  पेटले आहे. पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी बंद अवस्थेत असलेला सांगोला कारखाना सुरु करुन पंढरपूर व मंगळवेढा,माळशिरस व सांगोला तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नव संजीवनी दिली आहे. असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तर शेतकऱ्यांनी कारखाना एक महिन्याच्या आत चालू केल्याने अभिजित पाटील यांचे आभार मानले.यावेळी सांगोला ,मंगळवेढा,माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक शेतकरी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.