आ.शहाजीबापू पाटील यांची पुन्हा दमदार कामगिरी,दिलेला शब्द केला पूर्ण, कृषिमंत्री आले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हेआ.शहाजीबापूंचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत : कृषीमंत्री दादाजी भुसे
सांगोला,टीम------
सोलापुरात डाळिंब संशोधनाचा फार मोठा बोर्ड लागला असला तरी संशोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून डाळींबावर तेल्या, मर व कुजव्या रोगाने बागांची काय अवस्था झाली आहे. ते उघड्या डोळाने पाहून त्याच्यावर उपाय योजना कराव्यात तरच डाळिंब वाचू शकेल, संशोधकांनी या रोगावर काय उपाय असतील तर आमच्याही निदर्शनास आणून दिले तर बागा वाचवण्यासाठी शासन सुद्धा पुढाकार घेईल , महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याप्रती बांधील आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे शेतकरी राजा यांना अन्नदाता समजतात, शेतकरी व शेतमजुरांसाठी जे- जे काही करायला लागेल ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी अजनाळे येथील शेतकरी परिसंवादात दिला.
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे शनिवारी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी बामणी येथील सदाशिव (तात्या) साळुंखे यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रुट या फळबागेची पाहणी केली. त्यानंतर आ. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
बापू मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील एक सदस्य--
आ.शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. मुख्यमंत्री हे शहाजीबापूंचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या विविध विकास कामांना भरघोस निधी मिळत आहे. व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्याकरिता मी आमदार साहेबांच्या वतीने कटिबद्ध आहे-कृषिमंत्री दादा भुसे
अजनाळे ता. सांगोला येथे शेतकरी परिसंवादात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आ.शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर, प्रा. पी.सी. झपके ,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे, सभापती राणीताई कोळवले, पुणे विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजीत पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, मा.नगराध्यक्ष रफिक नदाफ,महेश साठे,यांच्यासह कृषी सहाय्यक,पर्यवेक्षक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना कृषी मंत्री भुसे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये डाळिंब बागांचे तेलकट डागामुळे तसेच मका पिकास सह इतर अनेक पिकांचे नुकसान झाल्याचे रस्त्यातून येताना दिसून आले आहे. अजूनही शेतात पाणी साचलेले आहे. म्हणून या सर्व पिकांचे पंचनामे करुन या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी विमा कंपन्याना सोबत घेवून आलोय असे सांगून आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी विमा काढला असून त्यापैकी ६० हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्या दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा तुमच्या कंपन्यांना महाविकास आघाडीचे सरकार हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम देखील विमा प्रतिनिधी तसेच कृषी विभागातील प्रमुख अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी दिला.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये ५० टक्के जबाबदारी यापूर्वी राज्य सरकारवर असायचे आणि ५० टक्के जबाबदारी केंद्र सरकारवर असायची परंतु गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारने आपली जबाबदारी १२.५ टक्के मर्यादित ठेवल्यामुळे विमा योजनेतून त्यांनी काढता पाय घेतला की ? काय अशी बोचक टीका त्यांनी केली. तसेच सांगोल्यात शेतकरी भवन झाले पाहिजे या मताशी मी सहमत आहे. तसेच ज्वारी खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीनुसार येत्या बुधवारी कॅबिनेटमध्ये हा मुद्दा आपला प्रतिनिधी म्हणून उपस्थित करून त्याचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी दिली.
आ.शहाजी बापूंनी शब्द केला पूर्ण----
यावेळी बोलताना आ. शहाजीबापू पाटील म्हणाले, अजनाळे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी विजय येलपले यांनी डाळिंब व रोगाबाबत कृषिमंत्र्यांना निवेदन द्यावे अशी मागणी माझ्याकडे केली होती. त्यावेळी मी मंत्र्यांना निवेदन देण्याऐवजी त्यांनाच थेट शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन येतो असा शब्द दिला होता. आज कृषिमंत्र्याना शेतकऱ्याच्या थेट बांधावर आणून खरा केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शेती व पिण्याचे पाणी दिले तर दीपकआबा आणि मी कारखान्याचा प्रश्न मार्गी लावला आहे . येत्या 15 ऑक्टोंबर पर्यंत कारखाना सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगोल्यात मध्यवर्ती प्रयोगशाळा करा--दीपक आबा
कृषी विभागाचे नेतृत्व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केले आहे. तालुक्यात शेततळी, फळबाग लागवड योजना त्यांच्या काळातच राबवली मात्र, सध्या हवामानाचे ऋतू बदलल्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न केला जाईल. यासंदर्भात कृषी मंत्री यांच्याशी सविस्तरपणे चर्चा झाली आहे. असे सांगत, डाळिंबाची परिस्थिती पाहता सांगोला तालुक्यात मध्यवर्ती प्रयोगशाळा होण्यासाठी त्याचा गांभीर्याने विचार व्हावा दुष्काळी पट्ट्यात कोणत्याही परिस्थितीत शेतीला पाणी दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.-----मा.आ. दीपक आबा साळुंखे पाटील
यावेळी विजयदादा येलपले, सतीश पाटील आदी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.
प्रास्ताविक पुणे विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार तर आभार जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी मानले.