अनेक दिवसांपासून च्या जखमी मोराला मिळाले नवे आयुष्य , गादेगावच्या तरूणाईचे यश

अनेक दिवसांपासून च्या जखमी मोराला मिळाले नवे आयुष्य , गादेगावच्या तरूणाईचे यश
जखमी मोराला मिळाले नवे आयुष्य , गादेगावच्या तरूणाईचे यश
पंढरपूर टीम--
माणसांच्या वेदना माणूस जाणू शकतो, व्यक्त करु शकतो. परंतु इतर सजीवांच्या बाबत तसे होत नाही. याउलट माणसाच्या विज्ञानवादी, आधुनिकीकरणाच्या भूमिकेमुळे अनेक सजीव जीवांना नाहक आपले जीव गमवावे लागत आहेत. परंतु अशा या जगात वन्यप्रेमी, पक्षीप्रेमी, समाजसेवक आजही आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.कारण तरुणाईच्या प्रयत्नामुळे अनेक दिवसांपासून जखमी असलेल्या एका मोराला जीवदान व नवे आयुष्य मिळाले आहे.

आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे याचा ही आज बर्याच जणांना विसर पडला आहे. गेल्या दोन दिवसापासून गादेगांव परिसरात लिंबारा, शिवरस्ता येथे एक मोर दुखापतग्रस्त होऊन एकाच जागी थांबला होता. याची माहिती  वृक्षमित्र दत्ता बागल व गणेश बागल यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ
बेवारस प्राणी, पशू पक्ष्यांसाठी कांम करत असलेल्या " ॲनिमल राहत" या संस्थेची मदत घेऊन दुखापतग्रसस्त मोराला वैद्यकीय उपचार मिळवून देऊन, अधिकच्या उपचार करिता पशू वैद्यकीय डाॅ. प्रल्हाद भिसे व त्यांचे सहकारी प्राणीमित्र माधवा पवार यांच्या स्वाधीन केले. यावेळी प्रशांत पाटील, विजय जाधव, सुरज शिंदे आदी उपस्थित होते. या तातडीच्या उपचारा व दक्षतेमुळे आपला राष्ट्रीय पक्षी असलेला एक जखमी मोर वाचविण्यात या तरुणाईला यश मिळाले आहे.
 त्यामुळे वृक्षमित्र दत्ता बागल व सामाजिक कार्यकर्ते गणेश बागल यांचे मोठे कौतुक व अभिनंदन केले जात आहे .
या प्रमाणेच इतर तरुणांनीही ही सजीव प्राण्यांना जीवदान दिले तर नक्कीच पर्यावरणासह निसर्गाचा समतोल सहजासहजी  राखला जाऊ शकतो असे प्रनिमित्रांकडून सांगितले जात आहे.