स्वाभिमानीच्या शिलेदारांनी केली दमदार कामगिरी,कार्यसम्राट दादांच्या मतदार संघात बसला जिल्ह्यातील पहिला "स्वाभिमानी डीपी"

स्वाभिमानीच्या शिलेदारांनी केली दमदार कामगिरी,कार्यसम्राट दादांच्या मतदार संघात बसला जिल्ह्यातील पहिला "स्वाभिमानी डीपी"

जिल्ह्यातील पहिल्या स्वाभिमानी DP चे झाले उद्घाटन

माढा, टीम-----


 टाकळी (टे) ता. माढा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नातून नवीन ट्रान्सफॉर्मर (डी.पी) मंजूर करून बसविला आहे.शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर या नवीन ट्रान्सफॉर्मर चे उद्घाटन व पूजन युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.

 ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन घेण्यासाठी MSEB च्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. एखादा नवीन डीपी घ्यायचा म्हटला तर आमदारांची शिफारस, त्यासाठी गावातील पुढाऱ्यांच्या मागे-पुढे फिरावे लागते ,परंतु कोणत्याही गाव पुढाऱ्याच्या व नेत्याच्या पाठीमागे न लागता भीमा नदीच्या काठावर असलेल्या टाकळी(टे) येथील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातून हा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला. त्या ट्रांसफार्मर ला "स्वाभिमानी शेतकरी डीपी"असे नाव दिले. त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माढा तालुका अध्यक्ष प्रतापराव पिसाळ, स्वाभिमानी शेतकरी डीपी वरील शेतकरी, टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.

हा डीपी मंजूर करण्यासाठी स्वाभिमानी चे माढा तालुका अध्यक्ष प्रतापराव पिसाळ यांनी पाठपुरावा केला असून त्याला यश आले आहे.त्यामुळे नेते मंडळी व गाव पुढाऱ्यांचा कोणताही वशिला न लावता मंजूर झालेल्या हा व विशेषतः कार्यसम्राट आ. बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील पहिलाच डिपी असल्याचे पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांनी या प्रमाणेच जर स्वतःहून मैदानात येत प्रत्येक कामाचा पाठपुरावा केला तर कुणाच्याही मागेपुढे फीरण्याची वेळ येणार नाही. स्वाभिमानाने प्रत्येकाला शेतीपंपाचे रोहित्र मिळतील. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आमची संघटना असल्याचे याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले.

या डीपीमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या वीजेची समस्या सुटण्यास मोठा आधार लागला आहे.विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या दमदार कामगिरीचे शेतकऱ्यांमधून मोठे कौतुक होत आहे.