पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात अवतरतेय विकास कामांची बुलेट ट्रेन, 41 गावातील 106 वाड्या वस्त्यांच्या सौंदर्यात व विकासात पडणार मोठी भर

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात अवतरतेय विकास कामांची बुलेट ट्रेन, 41 गावातील 106 वाड्या वस्त्यांच्या सौंदर्यात व  विकासात पडणार मोठी भर

मंगळवेढा,टीम----

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये विविध विकासकामांची बुलेट ट्रेन आल्याचे पहावयास मिळत आहे.पंढरपूरसह मंगळवेढ्यातील वाड्या,वस्त्या व गावांचा मोठ्या प्रमाणात कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील 41 गावातील 106 वाड्यावर त्यांच्या 150 कामासाठी 4 कोटी 38 लाख 22 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.

या निधीमधून हायमास्ट दिवे,पाणीपुरवठा योजना, पाण्याची टाकी,रस्त्यांचे खडीकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आर.ओ. प्लांट,काँक्रीट रस्ते,अंतर्गत गटारी, समाज मंदिर दुरुस्ती,सिमेंट पाईप गटार,अशी विविध  कामे करण्यात येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर गावाच्या सौंदर्या सह विकासामध्ये मोठी भर पडणार आहे.

या विकास कामांचे प्रस्ताव सादर करून मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि प सदस्या शीला शिवशरण, मंजुळा कोळेकर, नितीन नकाते यांच्यासह सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सुरेश ढोणे, माजी सभापती प्रदीप खांडेकर,विमल पाटील, उज्वला म्हस्के, नितीन पाटील, कल्पना गडदे, रमेश भांजे यांच्यासह गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी जिल्हा स्तरावर पाठपुरावा केला आहे.

गावांसाठी मंजूर झालेला निधी (कंसात लाखात)

महमदाबाद (शे.) 6.5 लक्ष्मी दहिवडी 7.5, तांडूर 6.5, खडकी 12 ,मूढवी 16.75 ,मानेवाडी 5, पडोळकरवाडी 2, ढवळस 6,हुलजंती 4. 35,भोसे 45.95, माचणूर 7.35,अरळि 10.70,जालिहाळ 15.35, डिक्सल 3, धर्मगाव 5. 70 ,सिद्धपुर 8.70, उचेठाण 5.30, आंधळगाव 9, संत दामाजी नगर 16, सलगर बुद्रुक 39.05,  सलगर खुर्द 15,तामदरडी 5.70, निंबोणी 7:35, खूपसंगी 5, महमदाबाद (हु) 4, कागष्ट 7:35, बठाण 7, नंदुर 14.82, तळसंगी 9, शिरणांदगी 16.80, पाटखळ 10.35,येड्राव 8.70 ,गोणेवाडी 14.5, ब्रह्मपुरी 3, बोराळे 3, देगाव 3.5, रहाटेवाडी 3, मरवडे 20.35, गुंजेगाव 7.35, भाळवणी 16.70

मतदार संघाला विकासाचे रोल मॉडेल बनविणार..

मतदार संघातील इतर सर्व गावांना निधी मिळवण्यासाठी जिल्हा परिषद व शासन स्तरावर लक्ष घालुन पाठपुरावा केला जात असून ही सर्व कामे गुणवत्तापूर्वक व्हावी यासाठी ग्रामस्थांनी सजग राहून आपापल्या गावातील मंजूर कामे चांगल्या पद्धतीने करून घ्यावित.पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये सर्व विकास कामे करून मतदारसंघाला विकासाचे एक रोलमॉडेल बनविणार आहे.

                 --आ. समाधान आवताडे,

             पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघ