पंढरपूर,टीम---
पंढरपूर तालुक्यात सर्वात मोठया बाजार पेठेचे व राजकीय, सामाजिक दृष्ट्या महत्वाचे गाव म्हणून करकंबची ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे नगरपंचायती साठी सन 2018 साली ग्रामसभेमध्ये युवा क्रांतीच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण वंजारी यांच्या नावाने ग्रामसभेच्या मंजुरीने करकंब नगरपंचायत यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सण 2018 साली नगरविकास खात्याकडून याबाबत अहवालाची सविस्तर मागणी करण्यात आली होती, सन 2020 मध्ये त्रुटींची पूर्तता करण्यासंबंधीचे पत्र ग्रामपंचायत व गट विकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांना दिले होते. त्यानंतर सन 2021 मध्ये पुन्हा त्रुटी संबंधित पत्र नगरविकास खात्याकडून देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत नेतेमंडळींच्या उदासीनतेमुळे त्रुटींची पूर्तता करू न शकल्यामुळे अद्यापपर्यंत करकंब गावाच्या नगरपंचायतीसाठी चा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे धूळखात पडून आहे.त्यामुळे आता नव्याने मनसे,भाजपा,शिवसेना व विविध सामाजिक संघटना ग्रामस्थ, पदाधिकारी कार्यकर्ते गावातील कार्यशील युवक वर्ग, महिला भगिनी व सर्वांनाच सोबत घेऊन अकलूज, नातेपुते येथील यशस्वी आंदोलनाच्या धर्तीवर मोठे जनआंदोलन सुरू होणार असून,आंदोलनांचा वणवा आता पंढरपूर तालुक्यात पेटणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.
करकंब गावावर राष्ट्रवादी,शिवसेना,भाजप,मनसे व इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांचे विशेष प्रेम आहे.कारण सर्वच पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठी फौज या गावामध्ये आहे. त्यामुळे सत्ताधारिंसह विरोधी पक्षात असलेल्या सर्वच राजकीय नेते मंडळींनी जर जनमताच्या रेट्याला आपल्या सोबत घेत त्यांच्या हातात हात दिला तर नक्कीच पहिल्याच दणक्यात करकंब गाव नगरपंचायत होऊ शकते. परंतु यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून या नेतेमंडळींनी एका व्यासपीठावर एकत्र येणे गरजेचे आहे.त्याची सुरुवात आता ग्रामस्थांनी हाती घेतली असून लवकरच करकंब मध्ये अकलूज पॅटर्नप्रमाणे आंदोलनांचा भडका होणार असल्याचे पाहावयास मिळणार आहे.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी व गाव नगरपंचायत होण्यासाठी ज्या काही बाबींच्या त्रुटी आहेत,त्या पूर्ण करून लवकरात लवकर संबंधित कार्यालयाकडे कागदपत्रांची पुर्तता केली जावी. अन्यथा मनसे,भाजपा, शिवसेना व सर्व गावातील सामाजिक संघटना व विरोधक यांना सर्वांना एकत्रित घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.
-----लक्ष्मण वंजारी,भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष