आता संपणार......पेट्रोल आणि डिझेलची कटकट , कोंबड्यापासून तयार होणार "बायोडिझेल",शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन

आता संपणार......पेट्रोल आणि डिझेलची कटकट , कोंबड्यापासून तयार होणार "बायोडिझेल",शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन

दिल्ली,टीम------

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे आणि मुंबईसारख्या शहरात पेट्रोलची किंमत 107 रूपयांच्या पुढे गेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार होत असल्यानं इंधनाचे दर वाढत असल्याचे  केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे.पण आता पेट्रोल आणि डिझेलची कटकट संपणार आहे. कारण आता कोंबड्यापासून बायोडिझेल तयार होणार आहे.


केरळच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयात प्राध्यापक जाॅन अब्राहम शिकवतात. प्राध्यापक म्हणुन काम करत असताना ते विविध विषयावर संशोधन देखील करत आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते चिकन वेस्टपासून बायोडिझेल तयार करण्यासाठी तंत्र विकसित करत होत.अखेर त्यांच्या या प्रयोगाला यश मिळालं आहे. त्यांना या शोधासाठीचं पेटंटही देण्यात आलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत या बायोडिझेलची किंमत कमी आहे. या बायोइंधनाद्वारे एक लीटरमध्ये गाडी 38 किलोमीटर प्रवास करते. तर प्रदूषण रोखण्यासाठी देखील हे बायोइंधन मदत करू शकतं. वायनाड येथील महाविद्यालयात प्राध्यापक जाॅन अब्राहम यांनी हे बायोडिझेल विकसित केल आहे. त्यासाठी त्यांना तब्बल 18 लाख रूपयांचा खर्च आला आहे.


दरम्यान, कोंबड्या आणि डुकरांच्या विष्ठेत विशिष्ट घटक असल्यानं त्यापासून सामान्य तापमानाला तेल काढणं सोपं असतं. त्यामुळे बायोडिझेल प्रक्रिया सोपी होते. 100 किलो चिकन वेस्टपासून 1 लीटर बायोडिझेल तयार केलं जाऊ शकतं. तर या बायोडिझेलला भारत पेट्रोलियमकडून गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.या मुळे पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतीमधून अनेकांची सुटका होणार असून पक्षी पालक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत.