शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन ,कटकट संपली,टेंशन मिटले, युरिया उपलब्ध होणार पॅकबंद बाटलीत

शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन ,कटकट संपली,टेंशन मिटले, युरिया उपलब्ध होणार पॅकबंद बाटलीत

नवी दिल्ली, टीम-----

सध्या आधुनिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा मोठा कल रासायनिक खते घेण्याकडे आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करून शेती करत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होत आहे.सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही या शेतीत सकस उत्पन्न मिळत असले तरी,मात्र नफा कमी होत आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर करून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल वाढला आहे.त्यामुळे साहजिकच ही खते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मात्र अनेक हालअपेष्टा सहन करावा लागत असतात.या खतांमध्ये सर्वात जास्त मागणी युरिया ला आहे. परंतु आता शेतकऱ्यांचे टेन्शन व कटकट संपणार आहे. कारण द्रवरूपात पॅकबंद  बाटलीत आता युरिया उपलब्ध होणार आहे.त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना समाधानाचे दिवस येणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आले. सामान्य यूरियाची मागणी 50 टक्केहून कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचे लाँचिगं करण्यात आलं आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरुपात उपलब्ध होईल.यानॅनो यूरियाची किंमत काय? नॅनो यूरिया हा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना  लवकरच उपलब्ध होणार असून नॅनो यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.

विविध पिकांवर चाचणी-----

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

मोठा फायदा----

नॅनो यूरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचा प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासा देखील मदत होणार आहे.तसेच हा युरिया बॉटल मध्ये असल्यामुळे संभाळणे सोपे जाणार असून पैशाची ,जागेची बचत होणार आहे.हा युरिया सहज उपलब्ध होणार असल्यामुळे युरिया घेण्यासाठी आता रांगेत तासन्तास उभे राहणे या प्रकारचे शारीरिक कष्ट कमी होणार असून उत्पन्न वाढीलाही मोठा हातभार लागणार आहे त्यामुळे मानसिक व आर्थिक दृष्ट्या हा परवडणारा युरिया असल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच "अच्छे दिन" येणार आहेत.