कोरोनाच्या महामारीत राज ठाकरेंचे मनसैनिक ठरताय देवदूत,बार्शीत फिरत्या कोविड ऑक्सिजन सेंटर मुळे रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी

कोरोनाच्या महामारीत राज ठाकरेंचे मनसैनिक ठरताय देवदूत,बार्शीत फिरत्या कोविड ऑक्सिजन सेंटर मुळे रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी

बार्शी,टीम-----

सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. नाईलाजास्तव परगावी जाऊन  मोठी पदरमोड करून बेड प्राप्त करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे या महामारी मध्ये रुग्णांना दिलासा देण्यासाठी अनेक जण पुढे आल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने राज ठाकरे यांच्या मनसेने मोठा पुढाकार घेतला आहे.  पंढरपूर मध्ये मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले यांच्या साथीने  प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी  प्लस हॉस्पिटल उभारल्यानंतर आता राज ठाकरेंच्या मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने फिरते ऑक्सिजन  कोविड सेंटर सुरू केले असून  या सेंटरमुळे अनेकांना नवसंजीवनी मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.

ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होऊ नये रुग्णांना तातडीने ऑक्सिजन मिळावा यासाठी मनसेचे बार्शीचे शहर अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फिरते अत्यावश्यक कोविड ऑक्सिजन सेंटर तयार केले असून या सेंटर मुळे 3 जणांचे प्राण वाचले आहेत त्यामुळे राज ठाकरेंचे मनसैनिक कोरोनाच्या महामारीत  देवदूत ठरत आहेत.


या सेंटर चा शुभारंभ 10 मे ला झाला .त्या नंतर दुसऱ्याच दिवशी बीआयटी कॉलेज कोविड सेंटर मधील सुहास कांबळे यांची ऑक्सिजन लेव्हल अचानक 60 झाल्याने धोका वाढला पण त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ राजेंद्र गायकवाड यांच्या सोबत संपर्क साधला,व या सेंटर मधून त्या रुग्णाला सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करून तेथे पुढील उपचार व ऑक्सिजन  त्वरित मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला.


12 मे रोजी माढा तालुक्यातील निमगाव केतकी मधील सत्यवान बोडरे (वय 60) हे अस्वस्थ होते. कारण त्यांना कोणत्याही ठिकाणी बेड मिळाला नसल्यामुळे ते बेशुद्ध झाले.तेव्हा या फिरत्या पथकास फोन आल्यानंतर त्यांनी हॉस्पिटल समोर बसमध्ये रुग्णास ऑक्सिजन लावला त्यामुळे जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये जाई पर्यंत तो वाढला व तेथे पुढील उपचार सुरू झाल्यामुळे त्यांचेही  प्राण वाचले.

दि.13 मे रोजी मारुती गाडेकर श्रीपत पिंप्री(वय 75) हेही अस्वस्थ होते त्यांचेही प्राण या फिरत्या ऑक्सिजन सेंटर मुळे वाचले आहेत त्यामुळे बार्शी शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना मनसेचे हे फिरते ऑक्सिजन सेंटर साक्षात  देवदूत ठरत असल्याचे पहावयास मिळत असून मनसैनिकांचा  हा उपक्रम कोरोनाच्या वाढत्या महामारीत  सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.