अभिजीत पाटील यांनी दाखवलेलं धाडस राज्यात नव्हेतर देशाला दिशा देण्याचं कार्य करेल-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
धाराशिव साखर कारखान्याचा देशातील पहिल्या साखर कारखान्याचा ❝ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन❞ व्हर्चुअलव्दारे संपन्न
उस्मानाबाद,टीम----
सध्याच्या कोरोनाच्या संकटावर मात करून चेअरमन अभिजित पाटील यांनी हा सर्वात मोठा प्रयोग यशस्वी करून दाखवला.यासाठी लागणारे सर्व सामग्री त्यांनी १८दिवसात पूर्ण करून दाखवली. त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. साखर कारखानदारी अडचणीत आली असताना देखील अभिजित पाटील यांनी दाखवलेलं धाडस राज्यात नव्हेतर देशाला दिशा देण्याचं कार्य करेल. सर्व देशवासियांच्या वतीने खुप खुप त्याचं आभार मानतो असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
येथील धाराशिव साखर कारखान्याचा देशातील पहिल्या साखर कारखान्याचा ❝ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन❞ व्हर्चुअलव्दारे संपन्न झाले.
याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , जलसंपदा मंत्री जयंत पाटील , आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद पालकमंत्री शंकरराव गडाख , खा.ओमराजे निंबाळकर, आ. सुभाष देशमुख, आ. कैलास पाटील , शिखर बॅकेचे चेअरमन विद्याधर आनासकर, सदस्य महागांवकर, जिल्हाधिकरी कौस्तुभ दिवेगावकर,VSI चे एस.व्ही.पाटील, मौज इंजिनिअरिंगचे ओक यांच्यासह कागवाड, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,देश कोरोनाच्या अडचणीचा सामना करत असताना, पुढची लाट देशाच्या उंभरट्यावर आली असताना केवळ ऑक्सिजन हेच कोरोना वरील औषध आहे. असे असताना महाराष्ट्र राज्याने "मिशन ऑक्सिजन" चालू केले आहे.त्यात चेअरमन श्री.अभिजीत पाटील या तरुणाने मैलाचा दगड ठेवला आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे. आपल्या धाराशिव साखर कारखान्याचे नुकसान करून ऑक्सिजन निर्मिती केली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. कारखान्याच्या सर्व सहकारी टीमचं मी मनापासून धन्यवाद मानतो तसेच श्री.अभिजीत पाटील यांनी येणाऱ्या काळात सर्व कारखानदाराना मार्गदर्शन करावे; आपण सर्व मिळून या परिस्थितीचा सामना नक्की करू असा विश्वास दिला.
***कोण काय म्हणाले****
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार:-
ऑक्सिजनचा शोध घेण्याचा मार्ग सापडला धाराशिव साखर कारखाने पहिली बाजी मारली यासाठी ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहेत ३हजार मेट्रिक टन महाराष्ट्राचे उद्दिष्ट असून अभिजीत पाटील यांनी मार्गदर्शन करावं व इतर कारखान्याने त्यांची प्रेरणा घ्यावी. महाराष्ट्र राज्यात हा महत्व महत्वकांक्षी यशस्वी प्रयोग प्रयोग श्री.अभिजीत पाटील यांचा झालेला आहे.ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्या त्या वेळी शेतकरी व शेतकऱ्यांचा कारखाना व शेतकऱ्यांची लेकरं या देशाच्या मदतीसाठी धावून येतात. हे आज श्री.अभिजीत पाटील यांच्या रूपात ना आज आपल्याला सर्वांसमोर दिसून आलेला आहे. श्री.अभिजीत पाटील यांच्या मागे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
जलसंपदामंत्री श्री.जयंतजी पाटील:-
देशाला दिशादर्शक पाऊल माझे मित्र श्री.अभिजीत पाटील यांनी टाकले असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे सर्व कारखान्यांसाठी हे अनुकरण करणे गरजेचे आहे. त्यांना लागणा-या सर्वच परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. तरी आपण ऑक्सिजनचा पुरवठा करावा.
■ आरोग्यमंत्री श्री. राजेशभैय्या टोपे:-
आज इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती हा भारतातील एकमेव प्रकल्प आहे. देश महाभयंकर संकटाचा मुकाबला करत असताना धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दाखवलेले हे धाडस खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.ते महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे या प्रयोगाचे सर्व कारखानदारांनी अनुकरण करावे मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो.
■ पालकमंत्री श्री.शंकरराव गडाख:-
उस्मानाबाद जिल्ह्यात होत असलेल्या ह्या देशातील पहिल्या इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तसेच अभिजीत पाटील व त्यांच्या सर्व सहका-याने दिवसरात्र मेहनत करून केवळ १८दिवसात हा प्रकल्प उभा केला त्याचं मनापासून अभिनंदन.
■ खासदार श्री. ओमराजे निंबाळकर:-
उस्मानाबाद जिल्हाचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील हे पंढरीचा पांडूरंगच साक्षात धावून आल्याचं समाधान आज ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं उदघाटन करताना वाटलं.
चेअरमन अभिजीत पाटील:-
ज्यावेळी सर्व कारखानदारांची VSI मध्ये बैठक झाली त्यावेळी देशाचे नेते आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांनी केलेल्या अवाहनानुसार पवारसाहेब त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी हा प्रकल्प उभा करण्याचं धाडस दाखवलं. मी माझ्या कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प बंद ठेवून मौज इंजिनिअरिंग तसेच VSI च्या टेक्निकल सपोर्टमुळे व माझ्या संचालक मंडळ व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहका-यांने केवळ १८ दिवसात हा प्रकल्प उभा केला. ज्या ज्या वेळेस अडचण आली त्यावेळी पालकमंत्री गडाख साहेब तसेच खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील यांनी सहकार्य केले आज हा प्रकल्प उभा करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेतून मी समाजाची सेवा करत राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे राज्यातील नव्हे तर देशातील सर्व साखर करखान्यांसामोर एक वेगळा व प्रेरणादायी,आदर्श उपक्रम उभा राहिला आहे.यामुळे नक्कीच सध्या भासणाऱ्या प्राणवायूच्या संकटावर मोठा दिलासा मिळणार आहे.