राज्यातील शाळांची घंटा वाजणार ,सरकारने काढला मुहूर्त

राज्यातील शाळांची घंटा वाजणार ,सरकारने  काढला मुहूर्त

प्रजासत्ताक दिनानंतर वाजणार  शाळांची घंटा,

राज्यसरकारने दाखवला हिरवा कंदील

पंढरपूर---राज्यात शनिवार दि.16 जानेवारीपासून  कोरोना लसीकरणाची सुरवात होत आहे .त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने  अनेक  धाडसी निर्णय घेतले जात आहेत.यापूर्वी नववी, दहावी ,बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोनाचा मोठा फैलाव  सुरू झाल्यापासून  लॉकडाउन च्या  नियमामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळू हळू  सुरू होण्याच्या मार्गावर आहेत .आधी नववी ,दहावी ,बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बुधवार दिनांक 27 जानेवारी पासून इयत्ता ५ वि ते ८ चे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिली आहे .दरम्यान शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोना बाबतची योग्य ती  काळजी घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.राज्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आता  पाचवी ते आठवीच्या शाळा  सुरू होणार आहेत कोरोना महामारी  आल्या नंतर शाळा महाविद्यालये बंद करण्यात आलीत,शहरी भागात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले मात्र ग्रामीण भागात रेंज मुळे ऑनलाईन शिक्षनाचा खेळखंडोबा झाला.पालकांनी महागडे मोबाईल घेऊन शिक्षण पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला परंतु खेड्या खेड्यामध्ये यश आले नाही त्यामुळे अनेक महिन्यापासून मुलांच्या सहवासात राहणारे पालकही चांगलेच परेशान झाले होते.परंतु राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

मात्र धाडस करून ते आपल्या बालकांना नक्कीच शाळेत पाठवतात का हे मात्र प्रत्यक्षात शाळेची घंटा वाजल्यावरच  पहावयास मिळेल