मोठी व सुखद बातमी,20 स्कोर व दमा असलेल्या 80 वर्षाच्या आजीबाईने मिळवला कोरोनावर विजय
जगण्याची उमेद व मनाच्या ठाम आत्मविश्वासामुळे आजी जिंकली, कोरोना झाला पराभूत
पंढरपूर, टीम---
कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्यामुळे देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पंढरपूरात देखील कोरोनाचा हाहाकार सुरू आहे.रुग्णांना उपचारा वेळेत उपचार,ऑक्सिजन,रेडमिसिव्हर न मिळाल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. यात वयो वृद्धांबरोबर तरुणांनी देखील आपले प्राण गमावल्याची उदाहरणे आहेत. या भीतीदायक वातावरणातही एक सुखद घटना पंढरीत घडली आहे. येथील जैन मंदिरा जवळ राहणाऱ्या कमल मस्के या 80 वर्षांच्या आज्जींनी चक्क कोरोनावर यशस्वी मात केली आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंढरपुरात राहणाऱ्या या आज्जींना हाताचा खुबा मोडल्यामुळे दवाखान्यात भरती केले होते, तिथेच त्यांना कोरोनाची बाधा झाली.धक्कादायक बाब अशी की त्यांचा स्कोर 20 निघाला.त्यात त्यांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे मुलांनी आईच्या जगण्याच्या आशाच सोडून दिल्या होत्या.मात्र या आज्जीनी हार मानली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून ऑक्सिजन वर असलेल्या या आज्जी आता कोरोनावर मात करून सुखरूप पणे आपल्या घरी परतल्या आहेत.
एका बाजूला कोरोनाची मोठी भीती सर्वांच्याच मनात घर करून बसली असताना रोज अनेक लोकं मृत्यूमुखी पडत आहेत.त्यामुळे नेमकी कधी ही दुसरी लाट संपते या सर्वांचे लक्ष वेधले आहे.परंतु मनाचा ठाम निर्धार,साहस व आत्मविश्वास असेल कोरोनाचा स्कोर कितीही असुद्या त्या वर सहजासहजी मात करून विजय मिळवता येऊ शकतो हे या 80 वर्षाच्या आजीबाईंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे घाबरून न जाता मनाचा ठाम आत्मविश्वास व जगण्याचा ठाम निर्धार नक्कीच तुम्हाला कोरोनाच्या नव्हे तर चक्क यमाच्या दारातून सही सलामत आपल्या घरी आणू शकतो हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.