सिंहगड  मधील ७५ विद्यार्थ्यांची "पर्सिस्टंट" कंपनीत निवड

सिंहगड  मधील ७५ विद्यार्थ्यांची "पर्सिस्टंट" कंपनीत निवड

सिंहगड  मधील ७५ विद्यार्थ्यांची "पर्सिस्टंट" कंपनीत निवड

पंढरपूर----डिजीटल व्यवसाय धोरण, डिजीटल उत्पादन हे सक्षम करण्यासाठी "पर्सिस्टंट" ही कंपनी कार्यरत आहे. अशा या कंपनीत सिंहगड इन्स्टिट्यूटमधील ७५ विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी दिली.
      सिंहगड इन्स्टिट्युटच्या शिक्षण व्यवस्थेमधुन "सर्वोत्कृष्ट इंजिनिअर" तयार झाला पाहिजे. यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये व्यक्तीमत्व विकास, अध्यापन, संशोधन आणि आधुनिक पद्धतीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठीची तयारी करुन घेतली जाते.
       अभियांत्रिकी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या मेहनतीचे फळ हे त्यांना प्लेसमेंट मधुनच मिळत असते. यासाठी सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये प्लेसमेंट विभाग हा स्वतंत्र असुन विद्यार्थ्यांकडून कठोर मेहनत, सराव परिक्षा, मुलाखती, चर्चासत्र आयोजित करून सर्वोत्तम विद्यार्थी घडवून त्या विद्यार्थ्यांचे जगातील नामांकित कंपनीत प्लेसमेंट होण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचाच भाग म्हणून सिंहगड इन्स्टिट्युट मधील "पर्सिस्टंट" या नामांकित कंपनीत ७५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे. "पर्सिस्टंट" या कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ४.५ लाख ते ६.४ लाख इतके वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
      "पर्सिस्टंट" या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.