शेतात नव्हे तर चक्क हायफाय बंगल्यात गांज्याची शेती,साताऱ्यात परदेशी व्यक्तींचा कारनामा

शेतात नव्हे तर चक्क हायफाय बंगल्यात गांज्याची शेती,साताऱ्यात परदेशी व्यक्तींचा कारनामा

  उच्चभ्रू कॉलनीत वर्षभरापासून बेकायदा वास्तव्य

सातारा टीम-

    गांजा पिकवणे,विकणे यावर निर्बध आहेत,असा प्रकार कुठे आढळला तर पोलीस कारवाई होते परंतु  जिल्ह्यातील वाई शहरातील उच्चभ्रू कॉलनीमध्ये चक्का एका हायफाय  बंगल्यात दोन परदेशी व्यक्तींकडून गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.वाई येथील एका हायफाय कॉलनीत या  दोन परदेशी व्यक्तीच ही गांज्याची शेती गेल्या एक वर्षा पासून करत होत्या. पोलिसांनी  आरोपींना ताब्यात घेतले आहे.

***गांजा शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर

सातारा जिल्हयातील वाई येथील एका बंगल्यात परदेशी व्यक्तींनी गांजाची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित या परदेशी व्यक्तींनी गेल्या वर्षभरापासून या बंगल्यामध्ये गांज्याची शेती करून तयार केलेला हा अमली पदार्थ बाहेर विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी रात्री सातारा पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकला. यानंतर बंगल्यात गांजा पिकवण्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.या बंगल्यात गांजा पिकवण्यासाठी अनेक आधुनिक तंत्राचा वापर हे परदेशी व्यक्ती करत होते ही बाब देखील समोर आली आहे.

** पुण्यातील पथकाकडून माल सील

पुण्यातील अंमली पदार्थ तपासणी पथकाने हा सगळा माल सील करून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जे  परदेशी तरुण आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, ज्यावेळी या परदेशी व्यक्तींना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात होतं त्यावेळी हे परदेशी व्यक्ती चित्रीकरण करणाऱ्या मीडिया प्रतिनिधीच्या अंगावर धावून जात होते. त्याचबरोबर हाताच्या बोटांच्या वेगवेगळ्या कृती करून शिव्या देखील देत होत्या. हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोरच सुरू होता.   संबंधित परदेशी व्यक्तीं आणि त्यांच्या कडून जप्त केलेला माल पोलिसांनी वाई पोलीस ठाण्यात आणला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

**?बेकायदेशीर वास्तव्य--

 या प्रकारातील  धक्कादायक बाब म्हणजे हे दोन परदेशी व्यक्ती गेल्या वर्षभरापासून या बंगलो मध्ये व्हिसा नसताना देखील राहत होते, अशी माहिती सातारा पोलीस  अधिकारी धिरज पाटील यांनी दिली. मात्र, या बाबत कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे या सर्व प्रकारात पोलिसांनी अधिक खोलात जाऊन तपास केला तर बरीच माहिती समोर येणार असल्याची चर्चा होत असून या मध्ये कोण कोण सामील आहेत व सातारा ते फॉरेन हे कनेक्शन कसे,कोणाच्या आशीर्वादामुळे जुळले याचाही शोध लागू शकतो व एक मोठे रॅकेट हाती लागू शकेल अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.