मुख्याध्यापकासह संस्था सचिवाच्या तोंडाला सुटले होते पाणी,सापडले जाळ्यात,अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास घालत होते लाखो रुपयांची टोपी,जिल्ह्यातील प्रकार

मुख्याध्यापकासह संस्था सचिवाच्या तोंडाला सुटले होते पाणी,सापडले जाळ्यात,अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास घालत होते लाखो रुपयांची टोपी,जिल्ह्यातील प्रकार

मोहोळ,टीम----

सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लाच घेण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अनेक मोठमोठे अधिकारी,कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडत असल्याचे पहावयास मिळत आहे.जिल्हा परिषदेमध्ये दोन मोठ्या कारवाई झाल्यानंतर माळशिरस मध्ये एक मोठी कारवाई झाली त्या नंतर आता मोहोळ मध्ये लाचलुचपत विभागाने एक मोठी कारवाई केली असल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या लिपिकास शिक्षण संस्थेच्या सचिवाने  उर्वरित ५ लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी १ लाख रुपये स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.लाच मागणी करणाऱ्या सचिवा वर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


विजयसिंह गणपती पुजारी (वय ५६ वर्षे) व्यवसाय नोकरी,पद मुख्याध्यापक , जवाहर ग्रामविकास मंडळ , वाळूज ता .मोहोळ जि .सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे . तर संस्था सचिव खाजगी इसम शाम उर्फ रोहित जनार्दन कादे,याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबतची अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदार यांनी त्याचे दिवंगत वडिलांचे जागेवर अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपीक या पदावर नोकरी मिळणेकरीता जवाहर ग्रामविकास मंडळ , या संस्थेमध्ये विनंती अर्ज केला होता. 

संस्थेकडून तक्रारदार यांचे विनंती अर्जावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केली होती . या रिट पिटीशन अर्जावर न्यायालयात तक्रारदार यांचे बाजुने म्हणणे मांडून त्यांना अनुकंपा तत्वावर संस्थेमध्ये नोकरी देण्याकरीता यातील दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांचेकडे १४ लाख रुपये व सेवेत सामावुन घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी एक महिन्याचा पगार अशी लाचेची मागणी केली होती .त्यास अनुसरून तक्रारदार यांनी १४ लाख पैकी ९ लाख रुपये पहिला हप्ता म्हणुन नोकरीमध्ये रुजु होण्यापूर्वीच यातील आरोपींना समक्ष दिला होता . त्यानंतर न्यायालयाचे निर्णयानुसार तसेच तक्रारदार यांचे विनंतीनुसार तक्रारदार यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेनंतर यातील आरोपी मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांचेकडे १४ लाख रुपये रक्कमेपैकी उर्वरीत ०५ लाख रुपये संस्थेचे सचिव यांना देण्याकरीता तक्रारदार यांचेकडे तगादा लावुन सदर ५ लाख रुपये घेवुन भेटण्याकरीता बोलावले होते. .त्यावरून दि.१७ व १८ नोव्हेंबर  रोजी दोन्ही आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक यांनी ५ लाखांपैकी पहिला हप्ता १ लाख घेण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आरोपी सचिव यांना देण्याकरीता स्विकारली असता मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व आरोपी संस्था सचिव यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सदरची कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील , पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक,पोलीस अमलदार चडचणकर ,पो.ह. सोनवणे ,पोना घुगे , पोना. घाडगे , पोशि. जानराव , पोशि . पवार ,पोशि . सण्णके , पोशि. मुल्ला चा . पो . शि . सुरवसे , यांच्या पथकाने केली आहे.