पिकांचे नुकसान होते म्हणून जाब विचारणे पडले महागात,वाळू माफियांनी शेतकऱ्याला केली जबर मारहाण,सांगोल्यात घडली घटना

पिकांचे नुकसान होते म्हणून जाब विचारणे पडले महागात,वाळू माफियांनी शेतकऱ्याला केली जबर मारहाण,सांगोल्यात घडली घटना

सांगोला,टीम----

शहर व ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांनी चांगलाच हैदोस घातला असल्याचे पहावयास मिळत आहे. वाळू माफियांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत पण या प्रयत्नांना हरताळ फासत खुलेआम वाळू माफिया वाळू चोरत आहेत. त्यामुळे वाळू माफियांना आवर घालणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. माझ्या शेतामधून वाळूच्या गाड्या का नेतात, माझ्या पिकांचे नुकसान होते  अशी  विचारणा करणाऱ्या एका शेतकऱ्याला वाळूमाफियांनी बेदम मारहाण केली आहे. सध्या तो शेतकरी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे ही दुर्दैवी व धक्कादायक घटना सांगोल्यात घडली आहे.

 शेतकरी अंकुश सिताराम रोडगे वय- 32वर्षे ,रा.संजयनगर वाढेगाव ता.सांगोला यांना बेदम मारहाण झाली असून ते सध्या मेहता हस्पिटल सांगली येथे ते उपचार घेत आहेत.

वाढेगाव हद्दीत रोडगे यांची साडे तीन एकर शेती असून शेतीकरुन ते उदरनिर्वाह करित आहे त्यांची शेती नदीपासुन जवळच अंतरावर आहे. काही वाळु चोरी करणारे इसम त्यांच्या गाड्या रोडगे यांच्या शेतातुन वारंवार घेवुन जात असतात त्यामुऴे पिकांचे नुकसान होत असते. याबाबत त्यांनी तहसिलदार सांगोला तसेच पोलीस अधिक्षक सोलापुर यांना लेखी व तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत.

धनाजी जानकर व इतर काही लोक नदीतुन वाऴु चोरुन त्यांच्या वाळुच्या गाड्या  शेतातुन घेवुन जात आहेत असे रोडगे यांना समजल्यामुळे ते नाबार्ड चौक वाढेगाव येथे गेले. त्यावेऴी समोरुन धनाजी जानकर यांचा अशोक लेलंड दोस्त छोटा ट्रक वाऴुने भरलेला येताना दिसला तसेच त्याने पाठोपाठ धनाजी जानकर यांचीच काऴे रंगाची स्कार्पियो गाडी नं-3030 अशी वाहने आली. त्यावेऴी त्यांनी सदर वाळुची ट्रक आडविली व त्यांना माझ्या शेतातुन तुमच्या गाड्या का घेवुन जाता याचा जाब विचारला,त्यावेळी ट्रक चालक बालाजी जानकर खाली उतरुन आला त्याचे पाठोपाठ इतर दोन/तीन लोक आले व त्यांनी शेतकरी रोडगे यांच्या सोबत वाद घातला, त्याचवेळी पाठीमागुन आलेल्या स्कार्पियो मधील धनाजी जानकर ,विलास मेटकरी व इतर दोन अनोऴखी लोक आले व त्यांनी सर्वांनी मिऴुन  आमच्या गाड्या का अडवितो असे म्हणून रोडगे यांना गाडीतील खो-याच्या लाकडी दांडग्याने तसेच लोखंडी दांडक्याने मला मारहाण सुरु केली.तसेच बालाजी जानकर सोबत असलेला पप्पु देशमुख व इतर दोन अनोऴखी लोकांनीही  दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांच्या मारहाणमुऴे तेथेच ते जागेवर बेशुद्ध पडले.

 गावातील राहुल हजारे व दादा चौगुले अशांनी मिऴुन त्यांना गावातील पाटील डॉक्टरांचे दवाखान्यात नेले होते व तेथे ट्रीटमेंट देवुन त्यानंतर संध्याकाऴी सांगली येथील मेहता हस्पिटल मध्ये पुढील उपाचारासाठी अँडमिट केले आहे. सध्या ते मेहता हस्पिटल मधील आय.सी.यु .मध्ये अँडमिट असुन माझे उपचार सुरु आहेत. रोडगे यांना झालेल्या मारहाणीमध्ये पोटात, पाठीत व डावे पायाचे नडगीवर मुक्का मार लागुन पोटात रक्तस्त्राव झाला आहे.

 धनाजी जानकर , बालाजी जानकर , विलास मेटकरी, पप्पु देशमुख व इतर चार अनोळखी व्यक्ती अशांनी मिऴुन खो-याचेलाकडी व लोखंडी दांडक्याने पाठीत, पोटावर ,पायाचे नडगीवर बेदम मारहाण करुन गंभीर जखमी करुन बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आहे.

त्यामुळे त्यांच्या विरुद्ध रोडगे यांनी फिर्याद दाखल केलीअसून त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता 1860चे कलम 143,147,148,149,326 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सांगोला शहर व तालुक्यात वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस चांगलीच वाढत जात असल्याचे पहावयास मिळत आहे.