डोळ्यात चटणी टाकून सोने चांदी दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न फसला,मुलामुळे वाचले तब्बल 30 तोळे सोने,माळशिरस मधील घटना

डोळ्यात चटणी टाकून  सोने चांदी दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न फसला,मुलामुळे वाचले तब्बल 30 तोळे सोने,माळशिरस मधील घटना

माळशिरस, टीम------

डोळ्यात चटणी टाकून सोने-चांदी व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार माळशिरस मध्ये दि.21 ऑक्टोंबर गुरुवारी रात्री घडला परंतु सोने-चांदी व्यापाऱ्यासोबत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या मुलामुळे डोळ्यात चटणी टाकून त्या व्यापाराला लुटण्याचा प्रकार फसला असून मुलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 30 तोळे सोने वाचले आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की,योगीराज ज्वेलर्सचे मालक विष्णू बाळू निकम हे आपले दुकान बंद करून आपल्या घराकडे  मुलगा तुषार सोबत जात होते. मुलगा तुषार हा मोटारसायकल चालवत असतांना त्यांच्या मागे ते बसलो होते. निकम व त्यांचा मुलगा असे दोघेजन  शहा दारशी प्लट येथील त्यांच्या घराच्या जवळ श्री थिटे सर यांचे घराजवळील कॉर्नरवर  सांयकाळी 7.15 वाजेच्या सुमारास आले असता.त्यांच्या समोर रोडवर एक होंन्डा कंपणीची काळया रंगाची युनिकर्न मोटार सायकल उभी होती. त्या मोटार सायकलवर तीन अनोळखी इसम वय 20 ते 25 वर्षे वयाचे बसलेले होते. निकम यांची मोटार सायकल त्यांचे जवळ आल्यानंतर त्यांचेपैकी दोन इसम मोटार सायकलवरुन खाली उतरले व एक इसम त्यांची मोटार साकयल चालु करुन त्याचेवर बसलेला होता. त्यावेळी सदर दोन इसमांपैकी एका इसमाने निकम यांचा मुलगा तुषार याच्या  डोळयात चटणी टाकली व एका इसमाने त्याच्या हातातील काठीने दुकानदार निकम यांना  डोकीत मारुन मला जखमी केले. त्यावेळी सदर दोन इसमांनी निकम यांच्या हातातील बग हिसकाविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी  हातातुन बॅग सोडली नाही.या झटापटीत ते दोघे बापबेटे  मोटार सायकलवरुन खाली पडले. त्यानंतर मुलगा तुषार याने चोर चोर असे मोठमोठयाने ओरडल्यानंतर सदरचे तिन्ही इसम त्यांचे मोटार सायकलवर बसुन जेैन मंदीरासमोरुन अकलुज रोडकडे निघुन गेले. वरील तिन्ही इसमांनी तोंडाला काळया रंगाचे मास्क व अंगात गडद रंगाचे टि शर्ट घातले होते. सदरचे तिन्ही इसम हे बांध्याने सडपातळ व मध्यम उंचीचे होते. या सर्व  प्रकारामध्ये मात्र  सोन्याचे दागिणे अथवा मौल्यवान वस्तु चोरीस गेलेल्या नाहीत. त्यानंतर   तुषार याने जखमी झालेल्या आपल्या वडिलांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.

या प्रकाराबाबत विष्णु बाळु निकम (वय 58) वर्षे धंदा व्यापार जात - हिंदु मराठा रा.शहा दारशी प्लट माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

सोने चांदी दुकानदार व त्यांचा मुलगा तुषार याच्या डोळयात चटणी टाकुन दुकानदाराला लाकडी काठीने डोक्यात मारहाण करुन जखमी करुन ते सोबत घेवुन जात असलेल्या सोन्याची जबरी चोरी करणाऱ्या 3 अनोळखी इसमांचे विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 34,394,511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सोने चांदी व्यापारी व दुकानदारांमध्ये  मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाची तिसरी लाट मंदावली असल्यामुळे  आता सर्व काही अनलॉक झाल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत.परंतु अशातच ही घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुलगा तुषार याच्या सतर्कतेमुळे 30 तोळे सोने वाचले असल्यामुळे निकम परिवाराने सुटकेचा श्वास सोडला आहे मात्र त्यांच्या मनात त्या 3 लुटारून बद्दलची भीती कायम आहे.