इमारत निधी न दिल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला जबर मारहाण,मुख्याध्यापक व शिक्षकासह लिपीकवर गुन्हा दाखल

इमारत निधी न दिल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला जबर मारहाण,मुख्याध्यापक व शिक्षकासह लिपीकवर गुन्हा दाखल

पुणे,टीम-----

कोरोना महामारीच्या काळात इयत्ता 10 विचा निकाल लागल्यानंतर आता 11 वीच्या प्रवेशाची लघबघ सुरू झाली आहे.परंतू, दहावीचा निकाल आणण्यासाठी शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी इमारत निधी न दिल्याने विद्यार्थ्याला मारहाण करुन दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार शिरुर  तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावात घडला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी  मुख्याधापक, शिक्षक व क्लार्क अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही धक्कादायक घटना निमगाव म्हाळुंगी गावातील विद्या विकास मंदिर या शाळेत गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

या प्रकरणात मुख्याध्यापक रमेश चव्हाण, शिक्षक वाळके आणि क्लार्क संभाजी आनंदराव लांडगे ही गुन्हा  दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका 43 वर्षाच्या शेतकर्‍याने फिर्याद दिली आहे.त्यांचा 16 वर्षाचा मुलगा विद्या विकास मंदिर शाळेत इयत्ता दहावीला होता. या शाळेत,शाळेच्या इमारतीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जबरदस्तीने निधी गोळा केला जात होता. तो या शेतकर्‍याने दिला नव्हता. त्यामुळे त्यांचा मुलगा शाळेत गेल्यावर त्याला 10 वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला क्लार्क संभाजी लांडगे याने देण्यास नकार दिला होता. ही बाब मुलाने वडिलांना सांगितले. हे लिपिक लांडगे याला समजल्यावर त्याने चिडुन जाऊन फिर्यादीच्या मुलाला हाताने मारहाण केली. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी फिर्यादी मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना दमदाटी केली. पोलीस निरीक्षक गेडगे तपास करीत आहेत.

या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे कारण हा धक्कादायक प्रकार विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात घडला आहे.त्यामुळे संबधीत मुख्याध्यापक,शिक्षक व लिपीकवर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे