संचारबंदीसह जमाबंदीला केराची टोपली, चांडाळ चौकडीच्या करामतीचे ठेवले किर्तन,किर्तनकार कलाकारासह सह 9 जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीसह जमाबंदीला केराची टोपली, चांडाळ चौकडीच्या करामतीचे ठेवले किर्तन,किर्तनकार कलाकारासह सह 9 जणांवर गुन्हा दाखल
माळशिरस,टीम----

तालुक्यातील लोणंद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदी असातानाही किर्तनाचा कार्यक्रम ठेवुन गर्दी जमवल्या प्रकरणी चांडाळ चौकडीच्या करामती या मराठी वेबसिरीज मधील नामांकित कलाकार भरत शिंदे यांच्यासह ९ जणांवर नातेपुते पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधुन करमणूक तर किर्तनातुन समाज प्रबोधनाचे धडे देणारे ह. भ. प. भरत शिंदे उर्फ बाळासाहेब  यांना कोरोना परीस्थितीचे गांभिर्य राहिले नसून ते स्वतः गर्दी जमवण्यास कारणीभुत ठरल्यामुळे त्यांचे चाहते व जनतेतुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


   याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरोना संसर्गाची गंभीर परीस्थितीत माळशिरस तालुक्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम यांना प्रतिबंध असतानाही लोणंद (खताळवस्ती) येथे तानाजी आबा खताळ यांच्या शेतात बाळुमामाचे मेंढरे बसवलेली होती.त्याठिकाणी मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील कलाकार ह.भ.प. भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्या किर्तनाचे आयोजन राजेंद्र दगडु रूपनवर, संदिप राजेंद्र रूपनवर, रघुनाथ हिम्मत रुपनवर, बापुराव ब्रम्हचारी रुपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ व दादासो शंकर शेंडगे रा. कन्हेर यांनी करून त्याठिकाणी ७०० ते ८०० लोकांची गर्दी जमवल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोणंद गावचे तलाठी संजय गोरे यांनी नातेपुते पोलिसात फिर्याद दिली.


   लोणंदचे गाव कामगार तलाठी संजय गोरे यांच्या फिर्यादेवरुन नातेपुते पोलीस ठाण्यात १) तानाजी आबा खताळ २) राजेंद्र दगडु रुपनवर ३) संदिप राजेंद्र रूपनवर ४) रघुनाथ हिम्मत रुपनवर ५) बापुराव ब्रम्हचारी रूपनवर ६) दादा महादेव खताळ ७) किसन दशरथ होळ सर्व रा. लोणंद ता.माळशिरस ८) दादासो शकर शेंडगे रा, कन्हेर ता. माळशिरस ९) भरत शिंदे उर्फ बाळासाहेब रा. कांबळेश्वर ता. बारामती यांचे विरुध्द भा.द.वि. कलम १८८, २६९, २७०४ आपत्ती व्यावस्थापन कायदा कलम ५१ (४) साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम २३४ महाराष्ट्र पोलीस अधि. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सपोनि मनोज सोनवलकर यांच्यासह पोहेक हांगे, पोना माने,पोकॉ. पोकॉ. जानकर,पोकॉ. घाडगे या पथकाने ही कारवाई केली.
किर्तन सोहळा आयोजकावर  कारवाई होणार का?


श्री संत बाळुमामा देवालय आधामपुर यांच्या वतीने माळशिरस तालुक्यातील लोणंद येथे भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१ आँगस्टला ह.भ.प.शिवलीला ताई पाटील,दि.२ आँगस्टला ह.भ.प.राजेंद्र मोरे महाराज,दि.३ आँगस्टला ह.भ.प.शुभांगीताई पाठक,दि.४ आँगस्टला ह.भ.प. अमोल सुळ,दि.५ आँगस्टला ह. भ. प.गिरी माहाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे प्रसिद्धी करण्यात आले आहे.

 कोरोनाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन गर्दी जमवण्यास बंदी असताना आयोजकांनी कायदा धाब्यावर बसवत लोकांच्या जिवितास धोका निर्माण करण्याचे काम केले असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का?हे पाहणे आता औसुक्याचे झाले आहे.