आईकडे जमिनीचा मागितला हिस्सा, स्वतःच्या मुलीचा क्रूर मातेने घेतला जीव, मंगळवेढ्यातील धक्कादायक घटना

आईकडे जमिनीचा  मागितला हिस्सा, स्वतःच्या मुलीचा क्रूर मातेने घेतला जीव, मंगळवेढ्यातील धक्कादायक घटना

पोलिसांनी 6 तासात लावला तपास

मंगळवेढा, टीम-----

(दि.११जून२०२१)

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" ही म्हण आजही समाजात भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. आई विना माणसाची दैनावस्था होत असते, पुन्हा सर्व काही मिळते परंतु आई मिळत नसते.सर्व नात्यांमध्ये आज आई आणि मुलीचे नाते हे न सर्वात  अतूट नाते मानले जात असून यानात्याला कुठलीही जोड देता येत नाही. परंतु जमिनीचा  हिस्सा मागितल्यामुळे एका आईनेच आपल्या  पोटच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा शहरातील अकोला रोडवर घडली आहे. या प्रकारामुळे आई ही किती निर्दयी होऊ शकते हे पहावयास मिळत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, या घटनेतील आरोपी महिला चंदाबाई कुबेर नरळे(वय 55)  यांनी दि. 9 जून रोजी रात्री अकरा वाजता आम्ही मायलेकी घराच्या गच्चीवर झोपलो होतो. पोटात कळ आल्याने मी बाहेर गेली तेव्हा माझी मुलगी मंगल कुबेर नरळे ( वय 35) तिच्या डोक्यात अज्ञात इसमाने दगड घालून खून केल्याची फिर्याद दाखल केली होती. व पहाटे चार वाजता अज्ञात इसमा विरुद्ध  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मारेकरी हा अज्ञात असल्याने खुनाचा तपास लावणे याचे पोलिसांना एक मोठे आव्हान होते.

या  घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तेव्हा पोलिसांनी फिर्यादी व आरोपी असलेली महिला चंद्राबाई नरळे तिला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली तेव्हा मयत ही जमिनीचा हिस्सा मागत असल्याने तिचा खून केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी तिला घटनास्थळी घेऊन सदर ठिकाणचा पंचनामा केला व डोक्यात घातलेला दगड जप्त करून त्या क्रूर मातेला अटक केली. आरोपीच्या पतीचे मागील सहा महिन्यापूर्वी निधन झाले होते.यामुळे मयत मुलगी ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या इकडेच राहत होती.

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, तपासी अंमलदार भगवान बोरसे, यांनी योग्य पद्धतीने तपास केल्याने केवळ 6 तासाच्या आतच या लावला आहे.

जमिनीचा हिस्सा मागितल्याने पोटच्या मुलीला एका क्रूर  मातेनेच  ठार मारल्याची मोठी धक्कादायक घटना मंगळवेढा शहरात घडल्यामुळे एका बाजूला जी माता ही जिवलग मैत्रीण  बनत असते  पण दुसऱ्या बाजूला तीच माता वैरीन ही बनू शकते हे या घटनेवरून पहावयास मिळत आहे.