तू आमच्या पार्टीचा नाही, "सरपंचाच्या" विरोधात बोलतो म्हणून ग्रामपंचायत सदस्यांसह इतर 9 जणांनी केली बल्प बसून मागणाऱ्याला बेदम मारहाण

तू आमच्या पार्टीचा नाही, "सरपंचाच्या" विरोधात बोलतो म्हणून ग्रामपंचायत सदस्यांसह इतर 9 जणांनी  केली बल्प बसून मागणाऱ्याला बेदम मारहाण

माढा, टीम------

ग्रामीण भागात गावच्या विकासामध्ये ग्रामपंचायत सिंहाचा वाटा उचलत असतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करून साम-दाम-दंड-भेद याचा वापर करत सत्ता मिळवली जाते. त्यामुळे साहजिकच सत्ता मिळाल्यानंतर विकास कामांमध्ये राजकारण होत असते व यामुळे तंटे,वादविवाद,भांडण तंटे होत असतात.अशाच एका घटनेतून आमच्या दारात असलेल्या लाईटच्या पोलला बल्प  बसवा म्हणणाऱ्या एकाला ग्रामपंचायत सदस्य इतर 9 जणांनी बेदम मारहाण केली आहे या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

याबाबतची अधिक माहिती अशी की, परमेश्वर नागनाथ राऊत (वय22)  रा. मानेगाव तालुका माढा हे 3 जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत सदस्य अशोक सुखदेव शेळके यांना आपल्या दारात असलेल्या लाईटवर पोलवर बल्प बसवून द्या म्हणून सांगण्यास गेले मात्र त्यांनी "तू आमच्या पार्टीचा नाही" त्यामुळे बल्प बसवणार नाही असे म्हणत  राऊत त्याच्याशी बाचाबाची केली.तेव्हा त्याचे नंतर बघू तू नेहमीच  आपल्या विरोधात  बोलतो असे म्हणून अशोक शेळके व इतर काही जण तिथून निघून गेले.

त्यानंतर 4 जून रोजी परमेश्‍वर राऊत हे आपल्या मित्राच्या घरी कार्यक्रम असल्याने जेवण्यासाठी गेले होते. जेवण करून मित्रासह ते मानेगाव एसटी स्टँड जवळ असलेल्या गाळ्या थांबले परंतु त्या ठिकाणी त्यांचा मित्र येत नसल्याचे लक्षात  गाडीवरून ते आपल्या घराकडे निघाले, तेव्हा गावातील तानाजी धनाजी लांडगे, उल्हास करू राऊत, अशोक सुखदेव शेळके, विश्वास लांडगे, नेताजी धनाजी लांडगे, विजय काटकर, मल्हारी मारुती शेळके, अक्षय विश्वनाथ लांडगे, योगेश विश्‍वनाथ लांडगे, व पांडुरंग शिंदे रा. सर्व मानेगाव हे तेथे आले. तानाजी लांडगे यांच्या हातात ऊस तोडण्याचा कोयता व इतरांच्या हातामध्ये लोखंडी गजा होत्या, तू मला माझे दारात बल्प बसण्यास सांगितले तू नेहमीच आमच्या व सरपंच चा बद्दल विरोधात बोलतो, असे म्हणून ग्रामपंचायत सदस्य अशोक शेळके यांनी राऊत यांना शिवीगाळ केली व हातातील लोखंडी गजाने मारहाण केली, मला मारू नका असे म्हणत असतानाही परमेश्‍वर राऊत यांना  गजाने हातापायावर मारहाण केली. काही जणांनी सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही लाथाबुक्क्यांनी या मंडळींनी मारहाण केली.  राऊत यांच्या डोक्यावर  वार ही करण्यात आले. तेव्हा खाली पडल्यानंतर आरडाओरडा केल्यामुळे भांडणाचा आवाज ऐकून काही लोक तिथे आले त्यांनी सोडावा सोडून केली. नंतर हे मारहाण करणारे हे सर्वजण निघून गेले. कुर्डूवाडी येथील सरकारी दवाखान्यात राऊत यांना नेेऊन परत बार्शी येथील पडवळ हॉस्पिटल मध्ये आणून उपचारास दाखल केले.

आपल्या घरासमोर असलेल्या लाईटच्या पोलवर बल्प बसवावा अशी मागणी केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य व इतरांनी परमेश्‍वर राऊत यांना बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे तानाजी धनाजी लांडगे, उल्हास केरू राऊत, अशोक सुखदेव शेळके, विश्वास लांडगे,नेताजी धनाजी लांडगे, विजय काटकर, मल्हारी मारुती शेळके, अक्षय विश्वनाथ लांडगे, योगेश विश्‍वनाथ लांडगे, व पांडुरंग शिंदे या सर्वांविरोधात  राऊत यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 143, 147, 148, 149, 323, 324,326,188,269, 504,506 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे ग्रामीण भागात आजही  विकास कामांमध्ये  मोठे राजकारण केले जाते व ते कोणत्या थराला जाऊ शकते आणि या राजकारणा मध्ये किती स्पर्धा व इरस असते हे पाहावयास मिळत आहे.