कोरोना लसीकरणात राजकीय लुडबुड,वशिलेबाजी करत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी, मिस्टर सरपंच पतीविरुद्ध गुन्हा दाखल,

कोरोना लसीकरणात राजकीय लुडबुड,वशिलेबाजी करत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी, मिस्टर सरपंच पतीविरुद्ध गुन्हा दाखल,

माढा, टीम-----

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  कोरोना लसीकरण सुरू आहे. या लसीकरणामध्ये आरोग्य केंद्राचे कर्मचारी, अधिकारी झोकून देऊन काम करत आहेत. मात्र लसीकरण सुरू असताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप व वशिलेबाजी पणा होत असल्याचे दिसत आहे. असाच राजकीय हस्तक्षेप रोपळे ता. माढा येथे झाला. केंद्रामध्ये लसीकरणाचे टोकन नंबर न घेता, रांगेतून लस न घेता, थेट लसीकरणा मध्ये घुसून माझ्या माणसांना लस द्या, अन्यथा तुम्ही नाही दिली तर तुमची बदली करून टाकीन, गावात राहू देणार नाही, बेइज्जत करून माझ्या गावातून हाकलून देईल अशी धमकी  महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना देत सरकारी कामात मिस्टर सरपंच पतीने अडथळा निर्माण केला आहे.त्यामुळे या मिस्टर सरपंच पती वर कुर्डूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की,रोपळे ता. माढा येथील आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण सुरू आहे.या लसीकरणा दरम्यान सर्वांना टोकन नंबर देऊन लसीकरण सुरू आहे.मात्र विद्यमान सरपंच वैशाली गोडगे यांचे पती व गावचे माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे हे कुर्डवाडी मध्ये राहत असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीला आरोग्य केंद्रात घेऊन आले.त्यावेळेस लसीकरणा च्या रांगेत उभे न राहता थेट लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी आत मध्ये येऊन टोकन नंबर न  घेताच, अगोदर माझ्या माणसांना लस द्या,तुम्ही दिली नाही तर तुमची बदली करून टाकीन, गावात राहू देणार नाही,बेइज्जत करून गावातून हाकलून देऊन असा  इशारा दिला. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. त्यानंतर पुन्हा 27 मे रोजी सकाळी आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असताना वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांना गोडगे यांनी मोबाईल फोन करून गावाला लस द्या नाहीतर तुम्हाला  जीवेमारीन, गावात फिरू देणार नाही,तुम्हाला डोके नाही, तुम्ही राजीनामा द्या अश्या प्रकारे फोनवरून व सक्षम येऊन धमकी देतात.सरकारी नोकरदार असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी वसंतराव भंडारे यांनी दुर्लक्ष केले त्यामुळेच गोडगे  यांनी सरकारी कामात  आडसर निर्माण केला.म्हणून डॉ. राखी वसंतराव भंडारे रा. सरकारी कॉटर रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी कुर्डवाडी पोलीस ठाण्यात मिस्टर सरपंच पती तात्यासाहेब गोडगे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्याद दिली असून भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 353,506 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.कारण यापूर्वी सोलापूर येथे  घरामध्ये विलगिकरणात असलेल्या एका महिलेची माहिती घेणाऱ्या अशा वर्करला त्या महिलेच्या पतीने जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. आता तर थेट वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेलाच कोरोना लसीकरणात राजकीय हस्तक्षेप करून मिस्टर सरपंचपती ने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात कोरोना महामारीत काम करणारे आरोग्य कर्मचारी, अधिकारी,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांना पोलीस सौरक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे.