3 पानाच्या तिरट साठी "हॉटेल गारवा" होते चांगलेच फेमस,जुगारासाठी येत होती तालुक्याबाहेरची हौशी मंडळी,मात्र कोरोनाच्या महामारीत गारव्याने केला हिरमोड,दाखल झाला गुन्हा
पंढरपूर,टीम------
रांझणी ता. पंढरपूर येथील हॉटेल गारवा जवळ संशयास्पद हालचाली दिसल्यामुळे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी तपासणी केली असता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर 22 लोक 52 पत्त्यांच्या तीन पानाचा तिरट, जुगार खेळत असल्याचे दिसून आले, तहसीलदार बेल्हेकर यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क करून कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानंतर पोलिसांनी 22 जणांना तालुका पोलीस स्टेशन मध्ये आणून त्यांच्यावर कारवाई केली असून 22 जणांकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.मात्र हा गारवा चांगलाच फेमस असल्याचे दिसत आहे. कारण कोरोनाच्या महामारीत उकाडा घालवून गारवा घेण्यासाठी या ठिकाणी शिवारातील हौशी मंडळींसह मोहोळ,मंगळवेढा या भागातून अनेक जण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हॉटेल गारवा मध्ये एका बाजुला एकुन 8 इसम तसेच दुस-या बाजुला 8 इसम व तीस-या बाजुला 6 इसम असे एकुन 22 इसम तीन वेगवेगळया ठिकाणी गोलाकार जुगार पत्याचे 52 पानावर पैशाची पैज लावुन तिरट नावाचा जुगार खेळत असलेले दिसले तेव्हा त्यांना गराडा घालुन पोलिसांनी पकडले,त्याचे हातात पत्याची पाने, मध्यभागी खाली जुगाराची पत्याची पाने व काही पैसे पडलेले दिसले.पोलिसांनी पंचासमक्ष पहील्या ठिकाणी गोलाकार बसलेल्या 8 इसमांना त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे 1) संजय गोविंद भानलवंडे वय 46 वर्षे रा. पंढरपुर 2) दत्तात्रय महादेव घोडके वय 36 वर्षे रा. अनवली त 3) पांडुरंग रामचंद्र गायकवाड रा.ओझेवाडी , 4) बंडु उर्फ राजाराम महादेव पाटील वय 35 वर्षे रा.रांझणी 5)राजु इनाम मनेरी वय 38 रा. मरवडे ता. मंगळवेढा 6)जावेद विलास मजुावर वय 50 वर्षे रा.चळे ता. पंढरपुर 7) अप्पा सिद्राम पाटील वय 43 वर्षे रा. घोडेश्वर ता. मोहोळ 8) आप्पा विश्वास वाघमोडे वय 32 वर्षे रा. चळे ता.पंढरपुर असे असल्याचे सांगितले दुस-या बाजुला बसलेल्या इसमांना त्याची नावे विचारले असता त्यांनी 9) दामोदर धोडींबा सांवत वय 52 वर्षे रा. आंबे ता. पंढरपुर 10) दत्तात्रय लव्हु चौगुले वय 40 वर्षे रा. रांझणी ता. पंढरपुर 11) समाधान गंगाधर माने वय 42 वर्षे रा.घोडेश्वर ता. मोहोळ 12) सुरेश श्रीरंग गांजाळे वय 43 वर्षे रा.अनवली ता. पंढरपुर 13)दत्तात्रय मुलीधर शिंदे वय 42 वर्षे रा.आंबे ता. पंढरपुर 14) भास्कर विष्णु नवले वय 36 वर्षे रा. आंबे ता.पंढरपुर 15) धनाजी औदुंबर लटके वय 36 वर्षे रा. मुडवी ता. मंगळेवढा 16)दत्तात्रय शहाजी गायकवाड वय 36 वर्षे रा. ओझेवाडी ता.पंढरपुर तसेच तीस-या बाजुला बसलेल्या इसमाचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे 17) सुभाष रामचंद्र जगताप वय 60 वर्षे रा. मरवडे ता.मंगळवेढा 18) शाम दरीबा शिंदे वय 40 वर्षे रा. आंबे ता.पंढरपुर 19) संभाजी शिवाजी गवळी वय 30 वर्षे रा. मलेवाडी ता. मंगळवेढा 20) पटटु माणिक प्रक्षाळे वय 38 वर्षे रा. चळे ता. पंढरपुर 21) दिलीप औदुबर जाधव वय 49 वर्षे रा. ओझेवाडी ता. पंढरपुर 22) सुभाष रघुनाथ कुलबर्मे वय 44 वर्षे रा.माचनुर ता. मंगळेवढा असे असल्यांची सांगितले या सर्वांकडून एकूण मिळून 38 हजार 400 रोख रक्कम व जुगार पत्याची पाने व काही मोबाईल सपोनि ओलकर यांनी जप्त करून त्याब्यात घेतली आहेत. सदर हॉटेल मालकाचे नाव योगेश अशोक दांडगे रा. रांझणी ता.पंढरपुर आहे.
या सर्व 22 इसमांना सरकारी वाहनासह पोलीस ठाणेस आणुण सी आर पी सी 41(अ)1 प्रमाणे नोटीस देवुन सोडुन देण्यात आले आहे. परंतु हे सर्व विनापरवाना बेकायदेशीरपणे जुगाराचे पत्याचे 52 पानावर पैशाची पैज लावुन तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळुन आली आहेत व योगेश अशोक दांडगे रा. रांझणी ता. पंढरपुर याने त्याचे मालकीच्या जागेत हटेलमध्ये जुगार खेळण्यास संमती देवुन त्याना सुविधा पुरविल्या म्हणुन यांचे विरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनयम कलम 4,व 5 प्रमाणे सरकार तर्फे पोहेक विक्रम चांगदेव काळे यांनी फिर्याद दिली आहे.पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.