पोलिसांची नजर चुकवून मुलाचे शेतात गुपचूप लग्न लावणे आले अंगलट, वऱ्हाडी मंडळींसमोरच झाला 50 हजाराचा दंड, मंडपातच फाडली पावती,जागेवर झाली वसुली

पोलिसांची नजर चुकवून मुलाचे शेतात गुपचूप  लग्न लावणे आले अंगलट, वऱ्हाडी मंडळींसमोरच झाला 50 हजाराचा दंड,  मंडपातच फाडली पावती,जागेवर झाली वसुली

सोलापूर,टीम----

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत जात असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात कडक नियमावली लागू करण्यात आली असून पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवा धारकांना पेट्रोल दिले जात आहे. संचारबंदी सह इतर अनेक नियमांचे सर्वसामान्य  नागरिकांना  बंधन घालण्यात आले आहेत.मात्र अश्यातही काही जण जाणीव पूर्वक कोरोना नियमांना पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे.आपल्या मुलाचे शेतात गुपचूप लग्न करणाऱ्या वरपित्याला पोलिसांनी चांगलाच झटका दिला असून थेट लग्न मंडपात जात कारवाई करून वरपित्याच्या हातात 50 हजार रुपयांची पावती देऊन दंड मंडपातच वसूल केला आहे.


या बाबत ची अधिक माहिती अशी की,कडक लॉक डाउन असतांनाही अनेक वरपिता व वधुपिता कोरोनाच्या नियमांना हरताळ फासत गुपचूप लग्न सोहळे पार पाडत आहेत.या लग्न सोहळ्यांना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पोलिसांच्या वतीने कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यतील रामपूर  येथे सोमवार दि.24 मे रोजी मल्लिकार्जुन महादेव सोनटक्के यांच्या मुलाचे लग्न होते.लग्नाचा मुहूर्त टाळून पोलिसांची नजर चुकवन्यासाठी शेतात लग्न सोहळा ठेवण्यात आला होता.याची माहिती पोलिसांना मिळाली.दुपारी 2 वाजता हा सोहळा सुरू असतांनाच पोलिसांच्या  थेटे भेट दिली,तेव्हा 25 पेक्षा अधिक माणसे या सोहळ्याला जमलेली होती त्यामुळे 50 हजार रुपयांचा दंड करून तो जागेवर  लग्न मंडपातच वसूल करण्यात आला.वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वामीराव पाटील,सहाफौ.शरनप्पा मेंगाने,संजय जमादार,हवालदार सूर्यकांत बिराजदार,मंथन सुळे,लक्ष्मण काळजे यांनी केली आहे.
या कारवाई मुळे वधुपित्यासह वरबापांची मात्र चांगलीच धाकधूक वाढली आहे.