दामाजी नगरीत धक्कादायक प्रकार,चक्क पाेलीस ठाण्यातच पोलिसांना दाखवला कुर्‍हाडीचा धाक, दिली धमकी ,घातला राडा, केली तुफान तोडफोड

दामाजी नगरीत धक्कादायक प्रकार,चक्क पाेलीस ठाण्यातच  पोलिसांना दाखवला कुर्‍हाडीचा धाक, दिली धमकी ,घातला राडा, केली तुफान तोडफोड

मंगळवेढ्यात  एकाविरूध्द गुन्हा दाखल


मंगळवेढा,टीम------


कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही  पोलीस बांधव जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था नीटपणे हाताळत आहेत, ऑन ड्युटी 24 तास रस्त्यावर तैनात उभे राहून सर्वसामान्य नागरिकांचे सौरक्षण करीत आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढयात  खाकीचा धाक संपुष्टात आला असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण  थेट  पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असणार्‍या  ठाणे अमलदारासह दोन पोलिस कर्मचार्‍यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून  व त्याच्याकडील दांडयाने ठोसा मारून तुम्ही पोलिस ठाण्यात  कसे काम करता बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणत खिडक्याच्या काचा,वॉटर कुलर व टिव्ही आदी साहित्यांची तोडफोड   करून 75 हजार रुपयांचे नुकसान एका आरोपीने केले आहे.या घटनेमुळे आता पोलिसांनाच सौरक्षण देण्याची वेळ आली असल्याचे पहावयास मिळत आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, या घटनेतील संशयित आरोपी धुळदेव जगन्नाथ अनुसे (रा.धर्मगाव रस्ता,मंगळवेढा)याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी धुळदेव अनुसे हा दि.12 रोजी 9.15 वा.मंगळवेढा पोलिस ठाण्यात   येवून कर्तव्यावर असणारे फिर्यादी पोलिस नाईक बापूराव पवार व पोलिस शिपाई तांबोळी यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून धक्काबुक्की करून कुर्‍हाडीच्या दांडयाने ठोसा मारला. तसेच तुम्ही पोलिस ठाण्यात कसे काम करता बघतोच असे म्हणून सरकारी कामात अडथळा आणला.व हातातील कुर्‍हाडीने पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा,वॉटर कुलर,टि.व्ही,अधिकारी व कर्मचारी यांची नावे असलेला बोर्ड फोडून 75 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे पोलिस नाईक बापूराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

दरम्यान मागील वर्षीही पोलिस ठाण्यात येऊन एका माथेफिरू व्यक्तीने पोलीस ठाण्यातील साहित्याची मोडतोड करीत पोलिसांना अरेरावीची भाषा वापरीत पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. एखादा व्यक्ती कुऱ्हाडीने पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर धाक दाखवून पोलीस ठाण्यातील साहित्याची मोडतोड करीत असताना इतर पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी नेमके काय करीत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

येथील  पोलिसांचा कुणालाही धाक राहीला नसल्यामुळेच अवैध धंदे वाले  कायदा धाब्यावर बसवून पोलिसांना आव्हान देत असल्याचे दिसत आहे.तसेच येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पोलिसांचा धाक कमी झाला असून आरोपींचे मात्र फावत आहे . याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी देणे गरजेचे असून पोलीसांची  डागाळत असलेली प्रतिमा सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा खाकी वर्दीवरील बदनामीचा डाग अधिकच गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.