हुल्लडबाजी नडली, मुरूम खाली करतांना महावितरणच्या तारेला चिटकला टिपर,मोठा अपघात टळला

हुल्लडबाजी  नडली, मुरूम खाली करतांना महावितरणच्या तारेला चिटकला टिपर,मोठा अपघात टळला

खुडूस, टीम---

राष्ट्रीय महामार्ग ९६५ मोहळ- पंढरपूर- पुणे-आळंदी पालखी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून. खुडूस स्मशानभूमी पासूल पंढरपूर साईट कडे समाधान आवताडे यांचे काम आहे. पुणे साईटला J M म्हात्रे प्राव्हेट लिमीटेड कंपनीला महामार्गाचे काम मिळाले असून रोडचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. खुडूस येथे J M म्हात्रे प्रा.लि.कंपनीचे मुरूम भरण्याचे काम सुरू असून टिपरच्या सहाय्याने मूरूम टाकत असताना शुक्रवार दिनांक २ मार्च २०२१ रोजी मुरूवाचा टिपर खाली करीत असताना टिपर महावितरणच्या तारेला चिकटल्याने टपरने जागीच पेट घेतला. टिपर चालक शॉकमुळे बाहेर फेकला गेला त्यामुळे सुदैवाने तो वाचला.मात्र टिपरचे जळून नुकसान झाले आहे. पाण्याच्या टॅंकरच्या सहाय्याने खुडूसगावातील नागरीक सिद्धार्थ मोटे,बजरंग शिंदे,अभिजीत साठे,प्रकाश लोखंडे,समाधान पवार व कंपनीचे कामगार यांच्या मदतीने टिपरला लागलेली आग विझवीण्यात आली.

सदर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर यापूर्वी असे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. वेगाने टिपर चालवणे, इतर वाहनांना कट मारणे, एकमेकांमध्ये स्पर्धा करणे असे  प्रकार टिपर चालकांकडून सतत होत असतात. त्यामुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  टीपर चालकांवर कंपनी अथवा प्रशासनाचा कोणताही धाक नसल्यामुळे ते  आपलीच मनमानी करून वेगाने वाहने चालवत असतात. त्यामुळे यांच्यावर व संबधित कंपनीवर कारवाई करावी  कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.