त्या प्राथमिक शिक्षकाकडे सापडले मोठे घबाड, 11 तासांच्या छाप्यानंतर धक्कादायक खुलासा

त्या प्राथमिक शिक्षकाकडे सापडले मोठे घबाड, 11 तासांच्या छाप्यानंतर धक्कादायक खुलासा
 25 एकर जमीन, 8 प्लॉटसह अनेक कोटींची संपत्ती 

भोपाळ,टीम----
गुरुजी या शब्दाबद्दल आजही ग्रामीण भागात मोठा मान सन्मान व आदर आहे परंतु     वर्षानुवर्षे काम करुनही कमी पगार मिळतो’ ही देशातील बहुतेक प्राथमिक शाळेतील शिक्षकांची तक्रार असते. पंकज श्रीवास्तव हे प्राथमिक शिक्षक याला अपवाद ठरले आहेत. सन 1998 पासून प्राथमिक शिक्षक असलेल्या श्रीवास्तव यांनी इतकी संपत्ती कमावली की अखेर त्यांच्या घरावर लोकायुक्तांना छापा मारावा लागला. तब्बल 11 तास चाललेल्या या छापासत्रात या प्राथमिक शिक्षकाच्या संपत्तीचे समोर आलेले आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.
 मध्य प्रदेशातील  भोपाळच्या लोकायुक्त पोलिसांनी उत्पन्नापेक्षा अधिक संपतीचा आरोपावरुन पंकज श्रीवास्तव यांच्या घरावर छापा टाकाला. त्यावेळी घरामध्ये मिळालेल्या कागदपत्रांमुळे सर्व अधिकार्‍यांना क्षणभर त्यांच्या डोळ्यांवरही विश्‍वास बसला नाही. पंकजने मागच्या 23 वर्षांमध्ये तब्बल 5 कोटींची संपत्ती जमवली आहे. यापैकी फक्त 36 लाख 50 हजार रुपये त्यांनी मासिक पगारातून कमावले आहेत.
श्रीवास्तव यांच्या घरामध्ये सुमारे 11 तास शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर विशेष टीमने तब्बल 3 सुटकेस भरुन कागदपत्रं नेली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती जमीन आणि निवासी प्लॉटच्या रजिस्ट्रीचे कागद सापडले आहेत. चेक बुक, पास बुक सह अनेक प्रकारची कागदपत्र विशेष पथकानं जप्त केली आहेत. मंगळवारी विशेष पथकाने एकाच वेळी दोन ठिकाणांवर छापा मारला होता. त्यामध्ये ही सर्व कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. श्रीवास्तव यांच्या लॉकरमधील संपत्तीचा सध्या तपास सुरू आहे.
आरोपीची एकूण 24 ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती उघड झाली आहे. भोपाळमधील मिनाल रेसिडेन्सीमध्ये डुप्लेकस, समरधामध्ये प्लॉट, पिपालियामध्ये एक एकर जमीन, छिंदवाडामध्ये सहा एकर जमीन, बैतूलमध्ये 8 निवासी प्लॉट, 6 दुकानं, बगडोना आणि अन्य 10 गावांमध्ये एकूण 25 एकर शेत जमीन अशा एकूण 5 कोटींच्या संपत्तीचे श्रीवास्तव मालक असल्याची माहिती समोर आली आहे.
पंकज श्रीवास्तव गरजू व्यक्तींना चढ्या दराने व्याज देत होता. त्यानंतर त्यांची संपत्ती गहाण ठेवून कर्ज न चुकवल्यास स्वत:च्या नावावर करुन घेत असे. आरोपीनं त्याच्या मित्राच्या मदतीनं श्रीराम आयटीआय संस्थेच्या निर्मितीमध्ये जवळपास 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचबरोबर नागपूरमध्येही त्याचा 10 लाख रुपये किंमतीचा एक प्लॉट असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात श्रीवास्तव याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे प्राथमिक शिक्षक किती घबाड कमावू शकतो हे उघडकीस आले असून आज अनेक गुरुजी राजकारण,प्लॉट व्यवसाय,जमीन खरेदी विक्री व्यवसायात उतरले आहेत.त्यामुळे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात गुरुजी मंडळीही सर्वच बाबतीत आघाडीवर राहत आहेत.