4 जर्सी गाय,1 म्हैस,1 शेळी वर चोरट्यांनी मारला डल्ला, मोहोळ मधील प्रकार, 2 लाख 5 हजारांचा माल लंपास

4 जर्सी गाय,1 म्हैस,1 शेळी वर चोरट्यांनी मारला डल्ला, मोहोळ मधील प्रकार, 2 लाख 5 हजारांचा माल लंपास
मोहोळ,टीम--
कोरोनामुळे शेतकरी परेशान झाला असून शेती मालाचे दरही गडगडले आहेत. केंद्र सरकार च्या कायद्या विरोधात आजही शेतकऱयांचा संघर्ष सुरू आहे.निसर्गही पाहिजे तशी साथ दयायला तयार नाही असे असतांना आता चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर डल्ला मारण्याचे काम सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे.
वडाचीवाडी ता. मोहोळ येथील शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या ४ जर्सी गाई, १ म्हैस व १ शेळी अशी जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. तब्बल २ लाख ५ हजार रुपये किमतीची जनावरे चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पांडुरंग म्हमाणे यांची मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी येथे शेती आहे. जोडधंदा म्हणून त्यांनी २ दुधाच्या जर्सी गाई, २ जर्सी कालवडी व १ म्हैस व एक १ अशी जनावरे पाळली आहेत. दिनांक १३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे राजेंद्र  यांनी जनावरांना वैरण पाणी करून नेहमीच्या ठिकाणी पत्राशेड समोर बांधले व ते घरी गेले. दि. १३ मार्च  रोजी सकाळी सहा वाजता जनावरांना वैरण पाणी करण्यासाठी ते शेतात गेल्यानंतर रात्री बांधलेल्या ठिकाणी त्यांना जनावरे दिसली नाहीत. घरातीलच कोणीतरी जनावरांना चारायला घेऊन गेले असल्याचे वाटल्याने त्यांनी जवळपास शोध घेतला मात्र त्यांना कोठेही जनावरे आढळून आले नाहीत. याबाबत कुटुंबीयांकडे चौकशी केल्यानंतर जनावरांकडे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती गेले नसल्याचे समजले त्यानंतर राजेंद्र माने यांनी वडाचीवाडी परिसरात व मोडनिंब बाजारात जनावरांचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाहीत. अज्ञात चोरट्यांनी ४ जर्सी गाई, १ म्हैस व १ शेळी अशी एकूण २ लाख ५ हजार रुपयांची जनावरे चोरून नेल्याची फिर्याद राजेंद्र म्हमाणे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केली असून अधिक तपास मोहोळ पोलिस करत आहेत.या घटनेनंतर पशु पालक शेतकऱ्यांमध्ये मोठी घाबरत पसरली आहे.पोलिसांनी लवकरात लवकर या 
चोरट्यांना जेरबंद करावी अशी मागणी होत आहे.