जबरी चोरी करणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात, अनेक गुन्हे उघडकीस, ३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जबरी चोरी करणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात,  अनेक गुन्हे उघडकीस, ३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
 मोठे  गुन्हे आले उघडकीस,सर्वसामान्यांना दिलासा


सोलापूर (प्रतिनिधी) जबरी चोरी,घरफोडी,मोबाईल व दुचाकी चोरणार्‍या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.तीन गुन्हे उघउकीस आणून पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

शासकीय तंत्रनिकेतन जवळील वल्याळ ग्राऊंडजवळ काहि दिवसांपूर्वी दिवसा महिलेच्या हातातील पर्स पळवल्याची घटना घडली होती.या गुन्ह्याचा तपास करणार्‍या गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ३ मोठे  गुन्हे उघडकीस आले.

पुणे जिल्ह्यातील भिगवन येथे दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली.त्याचबरोबर केगाव-देगाव परिसरातूनही दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्याशिवाय वल्याळ ग्राऊंडजवळून महिलेची पर्स ओढून नेल्याचेहि त्याने पोलिसांना सांगितले.ट्रक चालकांना अडवून अल्पवयीन मुलगा मोबाईल चोरत असल्याचे हि तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दोन दुचाकी,पाच मोबाईल,एक संगणक असा मुद्देमाल हस्तगत केला.गुन्हे शाखेच्या पथकाने तीन गुन्हे उघडकीस आणले.हि कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर,पोलीस हवालदार अशोक लोखंडे,पोलीस नाईक शंकर मुळे,राजेश चव्हाण,विजयकुमार वाळके,संदिप जावळे,संतोष येळे,सुहास अर्जुन व स्वप्नील कसगावडे यांनी केली.