चक्क ....सहीसाठी मागितली लाच,स्वतःच्या कार्यालयातच लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला सहायक अभियंता,जिल्ह्यात खळबळ

चक्क ....सहीसाठी मागितली लाच,स्वतःच्या कार्यालयातच लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात  सापडला सहायक अभियंता,जिल्ह्यात खळबळ

सोलापूर,टीम ------

सोलापूर जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी हे लाच लुचपत  विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे.नागरिकांच्या वतीने लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांचा पडदा फास  केला जात आहे परंतु तरीही अधिकारी व कर्मचारी हे भ्रष्टाचारामध्ये वारंवार गुंतत असल्याचे पहावयास मिळत आहे.


 सोलापूर महानगरपालिकेतील एक सहाय्यक अभियंता चक्क सहीच्या मोबदल्यात लाच मागताना रंगेहात सापडला असल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी महापालिका सोलापुर हद्दीत  शेळगी ते स्मशानभूमी येथे डांबरीकरणाचे काम केले आहे सदर डांबरी रस्त्याचे मोजमाप पुस्तकावर डिसेंबर मध्ये सही करून दिल्याचा मोबदला म्हणून 6000 तर बारामती बँक ते आकाशगंगा मंदिर येथील डांबरी रस्त्याचे मोजमाप पुस्तकावर सही करण्यासाठी 7000 अशी 13 हजार रुपये लाचेची मागणी सहाय्यक अभियंता सुनील लामकाने यांनी केली होती,सदर लाच  सोलापूर महापालिका इमारतीमध्ये त्यांच्याच कक्षामध्ये  स्वीकारत असताना रंगेहात सापडले आहे.


 संबंधित सहाय्यक अभियंता सुनील लामकाने विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, कारण वारंवार अनेक अधिकारी व कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडत आहेत परंतु तरीही भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसलेला नाही.
सदरची कारवाई  पुणे विभाग  पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपाधीक्षक सोलापूर गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोलापूर उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार शिरीष कुमार सोनवणे,पोना अतुल घाडगे,पोकॉ  स्वप्निल सन्नके, सलीम मुल्ला, यांच्या पथकाने केली आहे.
 जर कोणी शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्याबाबत भ्रष्टाचार संबंधात काही तक्रार असल्यास लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना वतीने करण्यात आले आहे. सदर ची कारवाई 16 फेब्रुवारी रोजी झाली आहे.