नळदुर्गहुन सोलापूरकडे मोटरसायकलवरून मित्रा समवेत येत असताना अणदुर जवळ समोरून येणाऱ्या एसटी बसने धडक दिल्याने सिविल हॉस्पिटल मध्यील शिकाऊ डॉक्टर जागीच ठार झाले तर त्यांच्यासमवेत असलेले दुसरे डॉक्टर हे जखमी झाले.ही घटना रविवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेची हकीकत अशी की,रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नळदुर्ग येथील किल्ला पाहण्यासाठी मित्र डॉ.किशोर कुमार पोखरण यांच्यासमवेत गेलेले
डॉ.विकासकुमार मीना (वय-२१) हे आपल्या मित्राच्या मोटरसायकलवरून पाठीमागे बसून सोलापूरकडे येत असताना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अणदुर जवळ समोरून येणाऱ्या एसटी बस क्रमांक एम.एच.१४.बीटी ३४८१ ने समोरून धडक दिल्याने मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले डॉक्टर मिना हे उडून एसटीच्या चाकाखाली गेले तर मोटर सायकल चालवणारे दुसरे डॉ.किशोर कुमार पोखरण (वय-२१) हे उडून बाजूला पडले. जखमी अवस्थेत दोघांनाही मित्र डॉ. राहुल भारदे यादी शासकीय रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच डॉ. मीना हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर डॉ. किशोर कुमार पोखरण यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सिव्हिल रुग्णालय परिसरात मित्र कंपनीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.ते दोघेही गुरुनानक चौकात असलेल्या डॉक्टरांच्या होस्टेलमध्ये राहत होते.