महाविकास आघाडी सरकारने ने घातली शेतकऱ्यांना टोपी. अतिवृष्टी च्या नुकसान भरपाईसाठी करणार ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन

महाविकास आघाडी सरकारने ने घातली शेतकऱ्यांना टोपी. अतिवृष्टी च्या  नुकसान भरपाईसाठी करणार ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन
|मोहोळ,टीम-----
(दि.६ जून२०२१)
राज्यात कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे.परंतु या सरकारच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही त्यामुळेच आपल्या न्याय हक्कसाठी त्यांना वारंवार रस्त्यावर यावे लागत असून शेतकऱ्यांनी या सरकारला जागे  करण्यासाठी ओल्या पडद्याने दंडवत घालण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये फळबागांचे व पिकांचे नुकसान झालेल्या पेनुर, पाटकुल, खंडाळी, पापरी व हिवरे यासह इतर राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी, तसेच दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामध्ये कोन्हेरी येथील ५८ शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाईही अद्याप दिली नाही, ती देखील त्वरित जमा करावी, अन्यथा १४ जून रोजी नागनाथ मंदिरापासून मोहोळ तहसील कार्यालयासमोर ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

       कोरोनाच्या महामारी मध्ये शेतकरी अडचणी मध्ये असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा करून प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य केेले नाही. या उलट हक्काच्या पैशाकरिता त्यांना वारंवार रस्त्यावर यावे लागत आहे.वास्तविक पाहता हे सरकार निर्माण होण्यापूर्वी यातील काही प्रमुख पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करू, सातबारा कोरा करू अशी आश्वासने दिली होती. मात्र यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसून कागदावरच ही आश्वासने रेंगाळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध भागात अतिवृष्टी होत आहे, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून दिलासा देण्याची गरज असताना केवळ कागदी पंचनाम्याचे काम करण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना टोपी घातल्याचे पहावयास मिळत आहे.त्यामुळेच दि.१४ जून रोजी नागनाथ मंदिर ते मोहोळ तहसील कार्यालयाच्या समोर ओल्या पडद्याने दंडवत आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रभाकर भैया देशमुख यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, विकास जाधव चंदू निकम, कुमार गोडसे, रणजीत चवरे, नितीन जरग, दत्तात्रय कदम, हनुमंत भोसले, गणेश भोसले, खंडाळी ग्रा प सदस्य तानाजी मुळे, उत्तम दादा मुळे, हरीभाऊ लोंढे आदी उपस्थित होते.
केवळ पोकळ आश्वासने----
पंढरपूर शहर व तालुक्यातील ही गेल्या दोन-तीन वर्षापासून अतिवृष्टीने चांगला तडाखा दिला आहे.पंढरी नगरीत पुरामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु अद्यापही  लोकांना या ठाकरे सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही. केवळ आश्‍वासनावर आश्वासनेच या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र पुरोगामी महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे.